पूर्ण मोबदला मिळेपर्यंत जमिनी सोडू नका - पाटकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

नवी मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात विस्थापित झालेल्या ग्रामस्थांनी पूर्ण मोबदला मिळेपर्यंत आपल्या जमिनी न सोडण्याचे आवाहन आज सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि उल्का महाजन यांनी केले. येथील प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाची जबाबदारी पूर्णपणे सरकारची असून, ती त्यांना नाकारता येणार नसल्याचेही या वेळी त्यांनी सांगितले. नवी मुंबईत बांधण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी 10 गावे विस्थापित होत आहेत. या वेळी मेधा पाटकर यांनी सांगितले, की प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणारी नुकसानभरपाई ही मूळ बाजारभावाच्या चारपटीने अधिक असायला हवी. हा बाजारभाव सरकारने ठरवलेला नसावा. सरकार जर 2030 साली वाढणाऱ्या ट्रॅफिकच्या काळजीतून विमानतळ उभारत असेल, तर 11 वर्षांत तिथल्या भूमिपुत्रांचे कुटुंबही वाढलेले असेल, याची योग्य ती दखल घेत त्यांच्या रोजगाराचा प्रश्नही सरकारने प्राधान्याने सोडवणे आवश्‍यक आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International Airport Issue Land Medha Patkar