Burger
Burger

'बुर्ज खलिफा'वर खवय्यांच्या उड्या...

शाकाहारींसाठी टोलेजंग 16 इंची बर्गरची मेजवानी
मुंबई - बदलत्या खाद्यसंस्कृतीत पिझ्झा आणि बर्गर यांना आबालवृद्ध खवय्यांची वाढती पसंती असल्याचे सर्वत्र आढळते. मांसाहारी खवय्यांसाठी बर्गरमध्ये अनेक पर्याय उपलब्ध असतात; तेवढा "चॉइस' शाकाहारी बर्गरप्रेमींना नसतो; परंतु मुंबईतील पश्‍चिम उपनगरातील चिट चॅट चाय कॅफेत मात्र शाकाहारी खवय्यांना अक्षरश: टोलेजंग बर्गर "सर्व्ह' केला जातो. विशेष म्हणजे दुबईतील "बुर्ज खलिफा' या जगातील सर्वांत उंच इमारतीचे नाव दिलेला हा बर्गर तब्बल 16 इंच उंच आहे. "इंटरनॅशनल बर्गर डे'निमित्त या बर्गरचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांनी गर्दी केली होती.

चिट चॅट चाय कॅफेचे रोहन चौधरी, हार्दिक व्होरा आणि निषेध शरय्या या त्रिकुटाच्या संकल्पनेतून "बुर्ज खलिफा बर्गर' साकारला. आकाराने मोठे "नॉनव्हेज बर्गर' अनेक ठिकाणी बनवले जातात; "व्हेज'मध्ये असा प्रयोग झाला नव्हता. म्हणून आम्ही तिघांनी मिळून शाकाहारी खवय्यांसाठी "मोठ्ठा' बर्गर बनवायचे ठरवले असे रोहन सांगतात. आम्ही "फूड लव्हर' असलो, तरी तेव्हा आम्हाला "फूड इंडस्ट्री'बाबत काहीच ठाऊक नव्हते. म्हणून आम्ही पहिल्यांदा अभ्यास केला आणि त्यातूनच हा महाकाय बर्गर प्रत्यक्षात आला. त्यापूर्वी उलटा-पुलटा बर्गर आम्ही देत होतो, अशी माहिती त्यांनी दिली.

चीज सॉसमध्ये डुंबलेला "बुर्ज खलिफा बर्गर' समोर आल्यावर खवय्यांच्या नजरा तृप्त होतात आणि भूक चाळवते. या बर्गरमध्ये एकूण सहा स्तर असतात. पाव, व्हेज पॅटिस, फ्रेंच फ्राईज, पनीर पॅटिस, चीज समोसा, वेगवेगळे सॉस असलेल्या आणि चीज सॉसने माखलेला हा 16 इंची बर्गर पुढ्यात आल्यावर खायचा कसा, असा प्रश्‍न खवय्यांना पडतो. अर्थात, त्याबाबत कॅफेमधील कर्मचारी त्यांना मार्गदर्शन करतात. सध्या 390 रुपयांना मिळणारा हा टोलेजंग बर्गर चार ते पाच जणांना पुरतो. "बुर्ज खलिफा' बर्गरची "चायनीज एडिशन' नुकतीच आली आहे. त्यात मंच्युरियन, नूडल्स, चायनीज पॅटीस आणि सहा प्रकारचे सॉस वापरण्यात येतात.

केळ्याचा बर्गर
कांदिवली-बोरिवलीत गुजराती आणि जैन या समाजांची मोठी लोकसंख्या आहे. त्यामुळे जैन बर्गर, पिझ्झा, सॅण्डविच तयार करण्यात येते. उपवासासाठी खास केळ्यापासून बर्गर तयार केले जातात; त्याचा पावही केळ्यापासूनच बनवलेला असतो. या कॅफेतील पास्ता पिझ्झा, फ्रेंच फ्राईज कॅंडी, मिसी नाचोज, उलटा-पुलटा बर्गर, मॅगी सिझलर आदी पदार्थही अत्यंत लोकप्रिय असल्याचे सांगण्यात आले.

सोमवार ते शुक्रवारी दररोज पाच ते सहा "बुर्ज खलिफा' बर्गर तयार करण्यात येतात. शनिवार आणि रविवारी 15 ते 16 बर्गरची ऑर्डर असते. शनिवारी आणि रविवारी ग्राहकांची जास्त गर्दी असते.
- रोहन चौधरी, चिट चॅट चाय कॅफे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com