वाशीत होणार आंतरराष्ट्रीय उद्योजक परिषद

वाशीत होणार आंतरराष्ट्रीय उद्योजक परिषद

ठाणे : मराठी उद्योजकांच्या उत्कर्ष आणि विकासासाठी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही संस्था गेली काही वर्षे झटत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 51 शाखा असून, अडीच हजार उद्योजक संस्थेचे सदस्य आहेत. उद्योजक क्षेत्रातील संधींची माहिती आणि देवाणघेवाण होण्यासाठी संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय उद्योजक परिषद 'उद्योगबोध 2019' चे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेविषयी माहिती देण्यासाठी ठाणे नरेंद्र बल्लाळ सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अशोक दुगडे, नरेंद्र बागडे, संतोष चासकर उपस्थित होते.

13 फेब्रुवारीला नवी मुंबई येथील सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे ही परिषद होणार आहे. सकाळी नऊपासून परिषदेस सुरवात होईल. सायंकाळी 6 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल. 14 फेब्रुवारीला समारोपाला उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. उद्योगक्षेत्रात नैपुण्य मिळविणाऱ्या उद्योजकांना यावेळी इंजिनिअर स्व. माधवराव भिडे आदर्श उद्योजक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

तसेच नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, सेक्रेटरी मिनिस्ट्री आॅफ एक्सटर्नल अफेअर भारत सरकार नवी दिल्लीचे आय.एफ.एस. ज्ञानेश्वर मुळे, मुंबई डबेवाला संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर, कलादिग्दर्शक नितीन देसाई, गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे अध्यक्ष सुनील मांजरेकर, मॅटाॅर आॅन रोड जगत शहा, शिवकथाकार सुमंत टेकाडे, शिवाचार्य महास्वामी डाॅ. जयसिद्धेश्वर असे विविध क्षेत्रातील उद्योजकांचे मार्गदर्शन उद्योजकांना लाभणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उद्योजक या परिषदेस उपस्थित रहाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com