आंतरराष्ट्रीय नाणे डिझाईन स्पर्धेवर मराठी मोहोर!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

मुंबई - जपान सरकारच्या टाकसाळीने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय नाणे डिझाईन स्पर्धेत सहभागी झालेल्या मुंबई टाकसाळीतील प्रसाद तळेकर आणि आतिष मंचेकर या दोन कलावंतांनी चांगले यश मिळवले आहे. जागतिक स्तरावरील या स्पर्धेवर त्यांनी आपली मोहोर उमटवली आहे.

जगातील 22 देशांतील 91 कलावंतांनी आपल्या कलाकृती या स्पर्धेसाठी पाठवल्या होत्या. अंतिम फेरीसाठी तळेकर यांना दुसऱ्या क्रमांकाचे एक लाख 20 हजारांचे (दोन लाख येन) आणि मंचेकर यांना 60 हजारांचे पारितोषिक मिळाले आहे. नाणे डिझाईन क्षेत्रात जागतिक स्पर्धेत भारतीय कलावंतांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या कलावंतांनी साकारलेल्या नाणे डिझाईनचे विषय भारतीय संस्कृतीवर आधारित आहेत. "खजुराहो द टेम्पल ऑफ लव्ह' या विषयावर तळेकर यांनी आणि "इंडियन क्‍लासिकल डान्स'विषयी मंचेकर यांनी आविष्कार दाखवला. 28 एप्रिलला जपानमध्ये पारितोषिक वितरण समारंभ होणार असून, तळेकर यांना त्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तळेकर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्‌चे आणि मंचेकर हे रहेजा स्कूल ऑफ आर्टस्‌चे विद्यार्थी आहेत.

Web Title: international coin design competition