शाळाबाह्य 7 मुलांना प्रवेश देउन आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

कल्याण - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आज शनिवार ता 8 सप्टेंबर रोजी कल्याण पूर्व मधील सम्राट अशोक शाळेने विजय नगर, गवळीनगर आणि आमराई येथील मजुरांच्या वस्तीत जाऊन शाळाबाह्य मुलांना शोधून काढले. व शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार वयानुरूप इयत्तांमध्ये आता त्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

करण सोमनाथ राठोड,अर्जुन सोमनाथ राठोड, महिमा विनायक कांबळे, रोशनी नवल जाधव, रेखा अबू राठोड, रोशनी प्रकाश कांबळे ही मुले शाळेपासून वंचित आहेत. आई बाबा दोघेही बिगारी किंवा इतर कामाला जातात.घरी लहान भावंडांना सांभाळण्याकरिता मोठा भाऊ किंवा बहीण घरी असतात  ही मुले शाळेपासून वंचित राहतात. शासन स्तरावरून लहान मुलांना सांभाळण्यासाठी पाळणा घर किंवा इतर सुविधा उपलब्ध केल्या तर गोरगरीबांची मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत .

जगातील गरिबीचे उच्चाटन व्हावे यासाठी शिक्षणाचा प्रसार होणे गरजेचे असल्याने युनेस्कोने 8 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरे करण्याचे  1969 च्या दशकापासून सुरू केले आहे. जगात अजूनही 70 कोटीहून अधिक निरक्षर आहेत. ही निरक्षरता दूर होण्यासाठी जगभरात विविध कार्यक्रम व उपक्रम हाती घेण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणून कल्याण पूर्व मधील  सम्राट अशोक हायस्कुलचे उपक्रमशील मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी निरक्षर शोध मोहीम हाती घेतली व त्यांना सात शाळाबाह्य मुले आढळली. 

आता या मुलांना विशेष प्रशिक्षणही शाळा देणार असून वयानुरूप इयत्तेमध्ये त्यांना प्रवेश देणार आहे. मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्या सोबत गणेश पाटील संतोष कदम शिक्षकांचा सहभाग होता .

Web Title: international Literacy Day Celebrated in kalyan