
International Short Film Festival : मुंबईत आंतराष्ट्रीय लघुपट महोत्सव संपन्न
मुंबई - पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, नारायण देसाई फाऊंडेशन व मेगा रिक्रेयशन तर्फे रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे 'आ॑तरराष्ट्रीय लघुपट महोत्सव" चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये बहुभाषिक लघुपटांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी काही निवडक लघुपट प्रेक्षकांसाठी दाखविण्यात आले.
यावेळी सर्वोत्कृष्ट लघुपट - बकरू व आरंभ तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता - संजय खापरे, अभिनेत्री - कल्पना राणे, दिग्दर्शक - अनुप ढेकणे, कथा -महेंद्र पाटील, पटकथा -मनिष मेहेर, संवाद -हासिम नागराल, छायांकन - अविनाश लोहार, संकलक -श्रीनिवास एन. जी. बाल कलाकार - सुदेश मिसाळ यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी चे संचालक संतोष रोकडे, अभिनेते विजय पाटकर, महोत्सवाचे आयोजक आरयन देसाई, दया चव्हाण, शिरीष राणे, दिलीप दळवी, सर्वणकर, सांडवे उपस्थित होते.
साहित्य संघ: पुरस्कार आवाहन
मुंबई मराठी साहित्य संघातर्फे दिल्या जाणाऱ्या नीलिमा भावे पुरस्कृत 'रा.भि.जोशी वैचारिक साहित्य पुरस्कार, कथाकार शांताराम पुरस्कार (कथाकाराच्या पहिल्या कथासंग्रहास), चंद्रगिरी पुरस्कार (अध्यात्मिक साहित्य) आणि मिलिंद गाडगीळ स्मृतिप्रीत्यर्थ 'बालसाहित्य पुरस्कार' या चार पुरस्कारांच्या विचारार्थ १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रकाशित झालेली पुस्तके ( दोन प्रती) ३१ जुलै पर्यंत पाठवण्याचे आवाहन साहित्य संघाने केले आहे.