जगभर इंटरनेट खंडित होणार

Internet
Internet

मुंबई - जागतिक पातळीवरील इंटरनेट सेवा देणाऱ्या प्रमुख पुरवठादार "दि इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाइन्ड नेम्स अँड नंबर्स"कडून (आयसीएएनएन) मुख्य डोमेन सर्व्हरच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे पुढील 48 तासांमध्ये जगभरातील इंटरनेट सेवा खंडित होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात बॅंकांनी इंटरनेट सेवा खंडित होण्याबाबत ग्राहकांना मेसेजद्वारे सावध केले आहे. सायबर हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर इंटरनेट सेवा सुरक्षित करण्यासाठी ही दुरुस्ती केली जाणार आहे.

मुख्य डोमेन सर्व्हरच्या देखभाल दुरुस्ती कामामुळे इंटरनेट यूझर्सना पुढील 48 तासांसाठी वेब पेज ऍक्‍सेस करण्यात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. यूझर आउटडेटेड ISP चा वापर करत असतील तर ग्लोबल नेटवर्क ऍक्‍सेस करण्यात अडचणी येऊ शकतात, असे "रशिया टूडे' या वृत्तपत्राने म्हटले आहे. यादरम्यान "आयसीएएनएन'कडून क्रिप्टोग्राफिक की बदलण्यात येणार आहे. यामुळे इंटरनेटचे ऍड्रेस बुक किंवा डोमेन नेम सिस्टम (DNS) संरक्षित करण्यात मदत होईल. सायबर हल्ल्याच्या वाढत्या घटना रोखण्याच्या दृष्टीने "सुरक्षित आणि स्थिर डीएनएस' गरजेचे आहे. त्यामुळे दुरुस्ती अत्यावश्‍यक असल्याचे कम्युनिकेशन्स रेगुलेटरी ऑथॉरिटीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com