आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा आविष्कार

आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा आविष्कार

स्वमग्नता, सेलेब्रल पाल्सी, डाऊन सिंड्रोम, मेंदूवर आघात झालेल्या मुलांना संभाषणासाठी उपयोग होईल...
मुंबई - अनेक कारणांमुळे वाचा गमावलेल्यांसाठी संभाषणाचा पर्याय देणारे ॲप्लिकेशन आयआयटीच्या विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून साकारले आहे. थेरपिस्ट, ग्राफिक डिझायनर्स, सॉफ्टवेअर प्रोग्रामर्स आणि ॲनिमेटर्स यांनी संयुक्तिकपणे जेलो हे संभाषणासाठीचे ॲप्लिकेशन तयार केले आहे. 

ॲप्लिकेशनचा फायदा हा स्वमग्नता, सेलेब्रल पाल्सी, डाऊन सिंड्रोम, मेंदूवर आघात झालेल्या मुलांना संभाषणासाठी होणार आहे. अनेक कारणामुळे वाचा गमावलेल्यांसाठी मदतनीस म्हणून या ॲप्लिकेशनची उपयुक्तता आहे. आयआयटी मुंबईच्या इंडस्ट्रिअल डिझाईन सेंटरमार्फत जेलो कम्युनिकेटर ॲप विकसित करण्यात आले आहे. हे ॲप्लिकेशन ॲन्ड्राईड टॅबलेट्‌स आणि मोबाईलवर वापरासाठी मोफत उपलब्ध आहे. 

यामध्ये अभिनव अशा व्हिज्युअल इमोशनल लॅंग्वेज प्रोटोकॉल (व्हीईएलपी) चा वापर करण्यात आला आहे. ॲप्लिकेशन हे वापरासाठी आकर्षक आणि सोपे अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे. जेलो ॲप्लिकेशनमध्ये ८२०० लाईन्सचा प्री प्रोग्राम असा इंग्रजी आणि हिंदी भाषेतला शब्दसंग्रह आहे. की-बोर्डचा वापर करून शब्दोच्चारानुसार वाक्‍य टाईप करण्यासाठी मदत होईल. दिनचर्येतील तोंड धुण्यापासून ते अंघोळीपर्यंत छोट्या छोट्या गोष्टी शिकवण्याचा पर्यायही ॲपच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. ॲपसाठी वापरण्यात आलेली माहिती, आयकॉन आणि उच्चाराचा फायदा हा भारतभरातील वापरकर्त्यांच्या गरजांनुसार तयार करण्यात आला आहे. मायक्रोसॉफ्ट डिझाईन एक्‍स्पो, ई कल्प यांसारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून जेलो ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com