कोठडीतील मृत्यूप्रकरणी प्रेमी युगुलाची चौकशी

कोठडीतील मृत्यूप्रकरणी प्रेमी युगुलाची चौकशी


मुंबई, ता. ३१ : विजय सिंह या तरुणाचा कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी मंगळवारी रात्री प्रेमी युगुलावर गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे. या युगुलाने विजय सिंहला बेदम मारहाण केली होती, असे पोलिसांनी जाहीर केले होते. त्यामुळे चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. 


दशरथ देवेंद्र आणि आफरीन यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे दोघे वडाळा ट्रक टर्मिनल येथील एमएमआरडीए कम्पाऊंड परिसरात बसले होते. विजय सिंहच्या दुचाकीचा प्रकाश या दोघांवर पडल्यामुळे खटका उडाला. पोलिस तेथे पोहोचण्याच्या आधी देवेंद्र आणि आफरीन यांनी विजय सिंहला बेदम मारहाण केली होती. त्यामुळे त्याच्या छातीला मुका मार बसल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असला, तरी अद्याप या दोघांना अटक केलेली नाही.


पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आफरीनने विजय सिंह आणि त्याच्या दोन मित्रांनी छेडछाड केल्याचा आळ घातला. त्यामुळे या तिघांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले आणि गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली, असे पोलिसांनी सांगितले. हा दावा त्याचे कुटुंबीय आणि स्थानिक रहिवाशांनी अमान्य केला आहे.

उच्च न्यायालयात जनहित याचिका
याप्रकरणी पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेऊन तपासाचा आदेश द्यावा, अशी मागणी ॲड्‌. अरविंद तिवारी यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. सुटीकालीन न्या. के. के. तातेड यांनी संबंधित याचिका मुख्य न्यायमूर्तींकडे दाखल करण्याचे निर्देश रजिस्ट्रार विभागाला दिले आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com