आयपीएल सामने देशाबाहेर नको ; उच्च न्यायालयात याचिका

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 August 2020

कोव्हिड 19 मुळे यंदाचे आयपीएल क्रिकेट सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये घेण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. यात आयपीएल सामने भारतातच घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुंबई : कोव्हिड 19 मुळे यंदाचे आयपीएल क्रिकेट सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये घेण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. यात आयपीएल सामने भारतातच घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

 शाब्बास मुंबईकर !  मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 80 टक्क्यांवर...

पुण्यातील वकील अभिषेक लागू यांनी ही याचिका केली आहे. आयपीएल हे उत्पन्न मिळण्याचे महत्त्वपुर्ण साधन आहे. त्यामुळे देशातील अनेक उद्योगांना चालना मिळते. मागील वर्षी सुमारे 475 अब्ज रुपये एवढे  ब्रॅण्ड मूल्य आयपीएलचे होते. हे बीसीसीआयचे प्रमुख उत्पन्नाचे स्त्रोत आहे. त्यामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएल न भरवता सामने भारतातच घ्यावे,  अशी मागणी करण्यात आली आहे.  याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

 टॉसिलीझमॅब इंजेक्शनच्या उपयुक्ततेबाबत समोर आली मोठी माहिती; म्हणून राज्यात भासतोय औषधाचा तुटवडा

 

... तर सप्टेंबरमध्ये सामने
आयपीएल सामने मार्चमध्ये होणार होते. मात्र, कोरोना साथीमुळे होऊ शकले नाहीत. आता 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान दुबई, शारजाह आणि अबूधाबी येथे भारत सरकारने परवानगी दिल्यास सामने घेण्याचे बीसीसीआयने जाहीर केले आहे.

IPL Don't leave the country Petition to the High Court

( संपादन ः रोशन मोरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL Don't leave the country Petition to the High Court