आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदी बढती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rashmi shukla

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे बेकायदा कथित फोन टॅपिंग प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे.

Rashmi Shukla : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदी बढती

मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे बेकायदा कथित फोन टॅपिंग प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. कॅबिनेट नियुक्ती समितीने शनिवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत 1988 आणि 1999 च्या तुकडीतील 20 अधिकाऱ्यांना बढती दिली. त्यात रश्मी शुक्ला यांच्यासह सदानंद दाते आणि अतुलचंद्र कुलकर्णी यांचादेखील आहे.

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या मार्च 2016 ते जुलै 2018 या कालावधीत पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या. त्या सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर असून हैद्राबाद येथे केंद्रीय राखीव दलाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक आहेत.

राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांसह इतर काही नेत्यांचे बेकायदा कथित फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर, कुलाबा पोलीस ठाण्यात शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तपास अंती काही महिन्यांपूर्वी रश्मी शुक्लाना दिलासा मिळत आरोपातून मुक्तता झाली होती.