आंगडिया खंडणीप्रकरणी आयपीएस सौरभ त्रिपाठींच्या मित्राला अटक

आंगडिया खंडणीप्रकरणी सौरभ त्रिपाठी मागील काही दिवसांपासून फरार आहेत
IPS officer
IPS officeresakal

आंगडियाकडून वसुली प्रकरणात फरार असलेला निलंबित आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी (IPS Saurabh Tripathi) यांच्या जवळच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राइम ब्रँचच्या (Crime Branch) सीआययू टीमने ही कारवाई केली आहे. सहाय्यक सेल्सटॅक्स आयुक्त आशुतोष मिश्रा यांना उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून काल दुपारी अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यासंदर्भात धडक कारवाई केली आहे. आंगडिया खंडणीप्रकरणी सौरभ त्रिपाठी मागील काही दिवसांपासून फरार आहेत आणि आता त्यांच्या मित्रालाही अटक झाली आहे. (Angadia ransom case)

IPS officer
'गणपती, नवरात्रीत लावल्या जाणाऱ्या डीजेमुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का?'

दरम्यान, आंगडिया खंडणी प्रकरणात काही पोलिस, आणि अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. यासंबंधित तीन अधिकारी तुरुंगात असून सौरभ त्रिपाठी फरार आहेत. त्यामुळे पोलिसांना तपास करत असताना यातील काही पैसे हे आयुक्त आशुतोष मिश्राकडे गेले असल्याचा संशय आल्याने त्यांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणा संबंधीत बरेच पुरावे मिळाले असल्याचा दावाही सीआययुकडून करण्यात आला आहे. त्यामुळे त्रिपाठी यांच्या मित्राला उत्तर प्रदेशातील बस्ती येथे जाऊन अटक करण्यात आली आहे. आज मिश्रा याला मुंबईत आणणार असून कोर्टात हजर केले जाणार आहे. यावेळीच पोलिसांकडून अधिकचे खुलासे केले जाण्याची शक्यता आहे.

न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेचे पथक आज मुंबईत पोहोचणार आहेत. पोहोचल्यानंतर आशुतोष मिश्राला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मुंबई क्राईम ब्रँचची टीम सातत्याने आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठीचा शोध घेत आहे. पण ते सापडले नाहीत. त्रिपाठी महिनाभरापासून फरार आहे. क्राइम ब्रँचची 2 टीम यूपीमध्ये हजर असून ती त्रिपाठीच्या शोधात असल्याची माहितीही समोर येत आहे.

IPS officer
'महाआघाडी सरकार कोर्टाच्या आदेशांची अमंलबजावणी का करत नाही'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com