'दंबग' IPS शिवदीप लांडे यांची महाराष्ट्रात नियुक्ती

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

मुंबई : बिहारमधील कामगिरीमुळे 'दंबग' म्हणून ओळखले जाणारे भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी (IPS) शिवदीप लांडे यांची मुंबई अंमली पदार्थविरोधी पथकामध्ये पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

वेशभूषा बदलून छुपे अवैध धंदे उघड करून अनेकवेळा कारवाया केल्याने लांडे यांचा धाक तिथे निर्माण झाला. बिहारमधील गुन्हेगारीचे प्रमाण अधिक असलेल्या प्रांतात अनेक माफियांवर लांडे यांनी जरब बसवली होती. 

मराठी असून आपल्या कर्तृत्वामुळे लांडे हे बिहारी जनतेत लोकप्रिय अधिकारी बनले आहेत. यापूर्वी बदली होत असताना त्यांना निरोप देण्यासाठी रस्त्याच्या बाजूला लांबच लांब रांग लागली होती. यावरून त्यांची तेथील लोकप्रियता अधोरेखित झाली.
लांडे यांनी बिहारमध्ये केलेल्या कामगिरीमुळे महाराष्ट्रातही गुन्हेगारी रोखण्यात ते धडाडीने काम करतील अशी अपेक्षा मराठीजनांना आहे.

Web Title: IPS shivdeep lande to lead anti-narcotics team in maharashtra