इक्‍बाल मिर्ची ५०० कोटींचा धनी

iqbal-mirchi
iqbal-mirchi

मुंबई - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्‍बाल मोहम्मद मेमन ऊर्फ इक्‍बाल मिर्ची याची ५०० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तपासात उघड झाले. यातील पाच मालमत्ता मुंबईत आहेत. या प्रकरणात ‘ईडी’ने इक्‍बालचे सहकारी हारून आलम युसूफ आणि रणजितसिंग बिंद्राया या दोघांना शुक्रवारी अटक केली. 

इक्‍बाल हा १९९३च्या मुंबई बाँबस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपींपैकी एक आहे. १९९४ मध्ये त्याला सरकारने तडीपार केले होते. दाऊद टोळीचा अमली पदार्थांचा ‘बाजार’ तो सांभाळत असे. त्याला पकडण्यासाठी ‘इंटरपोल’नेही नोटीस जारी केली होती. १९९५मध्ये तो विदेशात पळून गेला, १४ ऑगस्ट २०१३ला इक्‍बालचा लंडनमध्ये मृत्यू झाला.

मुंबईत इक्‍बाल आणि त्याच्या कुटुंबीयांच्या पाच मालमत्ता असल्याचे ‘ईडी’च्या तपासात उघड झाले आहे. खंडाळ्यात सहा एकर जमीन मेसर्स व्हाइट वॉटर लि.च्या नावावर आहे. त्याचा ताबा इक्‍बालच्या दोन मुलांकडे आहे. मुंबईतील ‘साहिल बंगलो’ इक्‍बालची पत्नी व मुलाच्या नावावर आहे. वरळीतील ‘समंदर महल’ येथील मालमत्ता इक्‍बालची बहीण व मेहुण्याच्या ताब्यात आहे. या सर्व मालमत्तेची किंमत ५०० कोटी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com