खुशखबर, खुशखबर, खुशखबर.. IRCTC देणार 'ही' खुशखबर..

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 December 2019

  • रेल्वे प्रवाशांसाठी IRCTC तर्फे पॉड हॉटेल 
  • मुंबई सेंट्रलमध्ये 25 खोल्यांनी सुरू होणार पॉड हॉटेल'
  • मार्च 2020 पासून प्रवाशांसाठी खुले 

मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टुरिझमने (IRCTC) मार्च 2020 पर्यंत मुंबई सेंट्रल येथे छोट्या आकाराचे पॉड हॉटेल प्रवाशांसाठी खुले करण्याचे नियोजन केले आहे. हे हॉटेल सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये राहणार असून सुखसोईंनी सुसज्ज अशा छोट्या आकारातील हॉटेल उभारण्यात येणार आहे. 

महत्त्वाची बातमी : भावे नाट्यगृह नववर्षात सुरू होणार!
 

अशा असतील हॉटेलमध्ये सुविधा 

नागरिकांच्या सुरक्षेसाठी हॉटेलमध्ये CCTV, स्वच्छतागृह, कॉफी शॉप अशा अन्य सुविधा असतील. संपूर्ण खोल्या वातानुकूलित असतात. कॅप्सूलच्या आकाराच्या या खोल्या असल्याने या खोल्यांना पॉड हॉटेल असेही बोलले जाते. असे आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Image

रेल्वे स्थानक परिसरातील खासगी हॉटेलचे दर आवाक्‍याबाहेर असल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर त्रास सहन करावा लागतो. यामुळे परवडणाऱ्या दरात सुरक्षित आणि आरामदायी सुविधा देण्यासाठी पॉड हॉटेल सुरू करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला.

हेही वाचा : अरुण गवळींना दिसली रेल्वे ट्रॅकवर बॉडी आणि त्यांनी ट्रेन तत्काळ थांबवली..
 

मुंबई सेंट्रल येथे पॉड हॉटेलसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या ठिकाणासाठी बुधवारी 18 डिसेंबरला निविदा उघडण्यात येतील. ठेकेदार नियुक्त केल्यानंतर साधारणपणे दोन ते तीन महिन्यांचा कालावधी पॉड हॉटेलच्या उभारणीसाठी देण्यात येईल.

मार्चपर्यंत मुंबई सेंट्रल येथे 25 खोल्यांचे पॉड हॉटेल उभारण्याचे नियोजन आहे. हॉटेल सुरू झाल्यानंतर 12 तासांसाठी प्रवाशांना या खोल्या भाड्याने देण्यात येतील, अशी माहिती आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

WebTitle : IRCTC has a good news for the people in mumbai check what is this service

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IRCTC has a good news for the people in mumbai check what is this service