सिडकोच्या कामांमधील अनियमितता, फडणवीसांचा पाय खोलात? वाचा CAG चा रिपोर्ट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 March 2020

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून जो 'कॅग'चा अहवाल राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे होता तो आज सभागृहात सादर करण्यात आला. या अहवालात मागच्या फडणवीस सरकारच्या काळात घेतलेल्या काही निर्णयांवर गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात सिडकोमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे. कॅगच्या अहवालात भाजप सरकारनं घेतलेल्या नवी मुंबई विमानतळ आणि  नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्प यांसबंधीच्या कामांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. या सर्व कामांमध्ये भाजप सरकारनं पारदर्शी निर्णय घेतले नाहीत, असं या अहवालातून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

हेही वाचा: अवघ्या ४ दिवसात मुंबईच्या आयुक्तांनी आधीचे 'हे' निर्णय बदलले 

काय म्हटलंय CAG च्या अहवालात 

  • भाजप सरकारच्या काळात 'नवी मुंबई विमानतळ' प्रकल्पात अनियमितता 
  • नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्पाच्या कामामध्ये अनियमितता
  • नवी मुंबई विमानतळाच्या १६ निविदांमद्धे अनियमितता
  • राष्ट्रीय स्तरावरच्या वर्तमानपत्रांमद्धे जाहीराती न देताच निविदा बहाल 
  • तब्बल ८९० कोटींची कामं अनुभव नसलेल्या ६ कंत्राटदारांना देण्यात आली
  • ७० कोटींची कामं निविदा न मागवता देण्यात आली
  • १५ कोटींपेक्षा जास्त कामं देण्यात मूल्यांकनाची कमतरता
  • नवी मुंबई विमानतळासाठी टेकडी कापून भरणा करण्यासाठी २२.८ कोटींचा खर्च
  • १० ठेकेदारांना लिलावात भाग न घेताच कंत्राटं देण्यात आली.  

अशा काही प्रकारचे मुद्दे या अहवालात मांडण्यात आले आहेत. 

Image may contain: text that says "विमानतळ (एनएमआयए) आंतरराष्ट्रीय प्रकाशनात किंमतीच्या सहा त्यांना प्रदान करण्यात असलेल्या कंत्राटांमध्ये, बोलीदारांच्या तांत्रिक पात्रतेसाठी मार्किंग प्रणालीला बोलीदारांचे निविदा मागविण्याच्या मार्गदर्शक कंत्राटांमध्ये असलेल्या कंत्राटदारांना मागविता पारदर्शकता अंतर्गत सिडकोने माहिती संनियंत्रण माहिती (आयटी) केली नव्हती, त्यामुळे अभियांत्रिकी प्रकल्पांसाठी विलंबाची किनारपट्टीचा समस्यांवर वेळेवर कालावधीसाठी मध्ये आली आला होता तलाव क्षेत्रांवर डांबरीकरण, मलनिस्सारण किलोमीटरचा वॉटर देणी पाणीपुरवठा बांधण्याचे खारफुटीने आच्छादलेली शर्तीचे अतिक्रमित करून मूल्याच्या विकास मिळालेल्या किंमतीतील दिले होते. विलंब कोटी घटकांवरचा टेकडी पासून कोटी साध्य 185.97 कोटी वसूल देखील प्रकल्पामधील सल्लागाराकडून करण्यातील विलंबासाठी"

VIDEO: आजींच्या अंगावरून धडधडत गेली मालगाडी, आजी मात्र दोन पायांवर उभ्या 

यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस:   

विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधात सावध पवित्रा घेतला आहे. "हे सर्व निर्णय सिडकोमार्फत घेण्यात आले आहेत. हे सर्व निर्णय घेताना सिडकोनं कोणत्याही मंत्र्यांना याबाबत सूचित केलं नाही. या संबंधीचे कोणतेही निर्णय मंत्रालयातून घेण्यात आलेले नव्हते." असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.  

त्यामुळे आता कॅगच्या अहवालावर सरकारची काय भूमिका असेल आणि महाविकास आघाडीचं सरकार भाजप सरकारच्या काळात झालेल्या व्यवहारांवर काय पावलं उचलते हे  बघणं महत्वाचं असणार आहे.

irregularities in work done by cidco during fadanavis government read cag report here        

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: irregularities in work done by cidco during fadanavis government read cag report here