लॉकडाऊनमध्ये चिडचीड वाढली, तणाव कमी करण्यासाठी लोकांनी आजमावले विविध उपाय

विनोद राऊत
Wednesday, 12 August 2020

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनदरम्यान घरात कोंडल्या गेल्यामुळे अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे विवीध अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यावर हा परिणाम विशेष जाणवला नाही

 

मुंबई : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनदरम्यान घरात कोंडल्या गेल्यामुळे अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे विवीध अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यावर हा परिणाम विशेष जाणवला नाही. मात्र लॉकडाऊनचा अवधी वाढत गेल्यानंतर मानसिक तणाव आणि  चिडचीडपणा अधिकच वाढला. यूअर दोस्त या मानसिक आरोग्यावर काम करत असलेल्या संस्थेने हा ऑनलाईन सर्वे केला होता. जवळपास 9 हजार लोकांशी बोलून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर कुटुंबीयांसह क्वारंटाईन

कोरोना होण्याची भिती, लॉकडाऊनची अनिश्चितता, वेतन कपात आणि रोजगार गमावण्याची भिती ही मानसिक स्वास्थ बिघडण्यामागील प्रमुख कारणे होती.  या तणावातून बाहेर पडण्यासाठी विवीध वयोगटातील लोकांनी संवाद वाढविण्यापासून ते विपश्यना करण्यापर्यंत वेगवेगळे उपाय आजमावल्याचेही चित्र आहे. ताणतणावामुळे  चिडचीड होणे  आणि झोप कमी लागण्याच्या तक्रारी अधिक होत्या. या दरम्यान अनेक जणांनी मानसोपचार तज्ञांचे सल्ले घेतले. 

BMC चा खासगी रुग्णालयाला दिलासा; रुग्णांकडून भरमसाठ बिले वापरल्याने केली होती कारवाई

या सर्वेतील महत्वाच्या निष्कर्ष
लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळातील तणावाचे प्रमाण
खूप अधिक तणाव- 23 % 
मध्यम तणाव – 51 टक्के 
तणाव नाही – 16 टक्के 

...

एप्रिल- जून महिना- तणावाचे प्रमाण वाढले 
तणाव वाढला- 55.3 टक्के 
तणावाचे प्रमाण जैसै थै - 24.8 टक्के 
तणाव कमी झाला- 19.8 टक्के 

...
विवीध समाजघटकावरचा तणाव परिणाम 
कर्माचारी - 52.3 टक्के 
विद्यार्थी-  36.1 टक्के 
बेरोजगार- 3.9 टक्के 
घरातील स्त्रिया- 2.2 टक्के 
व्यवसायीक/स्वयंरोजगार- 1.7 टक्के 

...
या घटकामध्ये तणावाचे प्रमाण वाढले 
सरासरी तणावाचे प्रमाण- 37
विद्यार्थी- 39 टक्के 
कर्मचारी- 35 टक्के
व्यावसायिक/स्वयरोजगार- 27 टक्के 

......
स्री पुरुष- तणावाचे  प्रमाण
पुरुष- 56.9 टक्के 
महिला- 43.1 टक्के 

..
लॉकडाऊनचा पहिला टप्पा- तणावाची प्रमुख कारणे
1.लॉकडाऊन केव्हापर्यंत चालणार
2. आपल्या आप्तजणांना कोरोनाची बाधा होणार
3. रोजगार गमावण्याची भिती
4. क्वांरटाईन व्हावे लागणार  

..
लॉकडाऊनच्या  तीन महिन्यानंतर, तणाव वाढण्यामागची प्रमुख कारणे
 1.काम आणि खाजगी जिवनात ताळमेळ नाही
2.परिक्षा पुढे ढकलल्या 
3.पगार कपात आणि नोकरी गमावली

...
देशातील प्रमुख शहरे, तणावाचे प्रमाण
सरासरी  प्रमाण- 37 टक्के 
मुंबई- 48 टक्के 
बंगलुरु- 37 टक्के 
नवी दिल्ली- 35 टक्के 
चेन्नई- 23 टक्के 

....
तणावामुळे कशावर परिणाम पडला 
चिडचीड होणे  – 22 टक्के 
झोप गमावणे- 11 टक्के 
एकटे वाटणे – 65 टक्के 
आहार  - 55 टक्के 

..
तणावावर मात करण्यासाठी काय केले 
विद्यार्थी 

मिंत्र परिवार, कुटुंबासोबत संवाद साधणे
नियमित व्यायम करणे
बातम्या कमी वाचणे
सोशल मिडीयाचा वापर घटवला 
विपश्यना

...
कर्मचारी 
मित्र आणि कुटुंबाशी सातत्याने संवाद साधणे
बातम्या कमी बघणे
व्यायाम करणे 
सोशल मिडीयाचा वापर कमी करणे
विपश्यना 

...
व्यावसायिक, स्वयंरोजगार
व्यायाम करणे
मित्र आणि कुटुंबाशी संवाद वाढवणे
बातम्या कमी पाहणे
विपश्यना 
सोशल मिडीयाचा वापर कमी 

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Irritation increased in the lockdown, people tried various measures to reduce stress

टॉपिकस