अंबानींची कन्या होणार पिरामल घराण्याची सून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

मुंबई - कॉर्पोरेट्‌समधील दोन बड्या उद्योग घराण्यांमध्ये रविवारी नातेसंबधांचे सूत जुळून आले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची कन्या ईशा हिचा विवाह पिरामल उद्योग समूहाचे प्रमुख अजय पिरामल यांचा पुत्र आनंदशी निश्‍चित झाला आहे. डिसेंबर महिन्यात ते विवाहबंधनात अडकतील. 

महाबळेश्‍वरमधील एका मंदिरात आनंदने ईशाला लग्नाची मागणी घातली. अंबानी कुटुंबीयांनी संमती दिल्यानंतर दोघांच्या लग्नाची बातमी रविवारी जाहीर करण्यात आली. दोन्ही कुटुंबीयांनी नुकतेच स्नेहभोजनही केले. 

अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांमध्ये तब्बल चार दशकांचा स्नेह आहे. अनेक वर्षांपासून मित्र असलेल्या ईशा आणि आनंद यांच्या विवाहामुळे दोन्ही घराण्यांचे संबंध आणखी दृढ होणार आहेत. आनंद पिरामल समूहातील पिरामल रिऍलिटी आणि "पिरामल स्वास्थ्य' या आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कंपनीचा संस्थापक आहे. पिरामल समूहात कार्यकारी संचालक असलेल्या आनंदने पेन्सिल्व्हानिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. त्याने हार्वर्ड येथून "एमबीए' केले आहे. ईशा सध्या रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या संचालक मंडळावर आहे. तिने येल विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी मिळवली आहे. ती सध्या स्टॅनफोर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएचे शिक्षण घेत आहे. 

Web Title: Isha Ambani gets engaged to Anand Piramal