'आयएसआय'चे हस्तक फारुखच्या आश्रयाला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

मुंबई - महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंबईतून अटक केलेला संशयित दहशतवादी फैजल मिर्झा (वय 32) याचा म्होरक्‍या फारुख देवडीवाला याच्या मुंबईतील घरी पाकिस्तानी गुप्तचर संघटना "आयएसआय'शी संबंधित व्यक्ती आश्रयास होती. त्या वेळी या टोळक्‍याने आरडीएक्‍ससारखी स्फोटकेही आणली होती, पण त्यांचा वापर कुठेही झाला नाही, असे सूत्रांनी सांगितले.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्‍वासू छोटा शकीलशी संबंधित असलेला फारुख देवडीवाला हा पाकिस्तानी पासपोर्टवर शारजामध्ये राहत होता. 1996 ते 1999 मध्ये शकीलसाठी सक्रिय असलेल्या फारुखचे नाव सुरत स्फोटात आले होते. त्याप्रकरणी त्याच्याविरोधात "पोटा' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2012 मध्ये फारुख विरोधात सुरत पोलिसांच्या विनंतीवरून इंटरपोलने "रेड कॉर्नर' नोटीस जारी केली होती. 2003 मध्ये फारुखच्या मुंबईतील घरी "आयएसआय'च्या हस्तकांनी आश्रय घेतला होता. गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पंड्या यांच्या हत्येप्रकरणी संशयाची सुई फारुख व शागीर अहमद शेख यांच्यावर आली होती. त्याच वेळी फारुखकडे व त्याच्या साथीदारांकडे आरडीएक्‍स असल्याचाही आरोप होता. पण, त्यानंतरच्या कुठल्याही स्फोटात आरडीएक्‍सचा वापर झाला नाही. त्यामुळे त्या आरडीएक्‍सचे नेमके काय करण्यात आले, याबाबत फारुखच प्रकाश टाकू शकेल, असेही सूत्रांनी सांगितले.

गुजरातमधून एकाला अटक
फारुखच्या संपर्कात असलेल्या 32 वर्षीय तरुणाला गुजरातमधून "एटीएस'ने अटक केली. अल्लारखा अबुबकर मन्सुरी असे त्याचे नाव असल्याचे समजले. तो व्यवसायाने वाहनचालक आहे. तो कच्छ येथील गांधीधाम परिसरातील रहिवासी आहे. याप्रकरणी त्याला न्यायालयापुढे हजर केले असता, 25 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हा तरुणही मिर्झासोबत पाकिस्तानात दहशतवादी प्रशिक्षणासाठी गेला असल्याचा संशय आहे.

Web Title: ISI agent farukh devadiwala residence terrorist