esakal | Vidhan Sabha 2019 :"हे मोदी नाही 'मंदी' सरकार" ; कोण म्हणतंय हे ?
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 :"हे मोदी नाही 'मंदी' सरकार" ; कोण म्हणतंय हे ?

Vidhan Sabha 2019 :"हे मोदी नाही 'मंदी' सरकार" ; कोण म्हणतंय हे ?

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई, ता. 16 : आज मंदीमुळे देशाची परिस्थिती चिंताजनक आहे. मुंबईतील 2 लाख कारखाने बंद पडले तर 8 लाख लोकं बेरोजगार झाले.हे सरकार कारखानदारांना फायदा पोचवणारे सरकार असून पुन्हा जर हे सरकार सत्तेवर आले तर मंदीच मंदी येईल.'हे मोदी माही तर मंदी सरकार असल्याची टीका करत भाजप-शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.

  • भाजपने आमचा 'अजेंडा' चोरला

चुनाभट्टीतील जाहीर सभेत प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा 'डिजिटल' जाहीरनामा प्रकाशित केला. यावेळी आंबेडकरांनी भाजपवर चौफेर टीका केली.भाजपचा जाहीरनामा ही प्रसिद्ध झाला असून मोफत शिक्षण, दुष्काळमुक्ती,स्वस्त वीज यासारखे आमचे अनेक मुद्दे त्यांनी चोरल्याचा आरोप आंबेडकरांनी केला.महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू,केजी ते पीजी पर्यंत मोफत शिक्षण देऊ,घनकचऱ्यावर वीज निर्मिती,वीजदर कमी करू,मुंबईतील मूळ भूमीपूत्रांच्या नावावर जमिनी करू,सफाई कामगारांना कायमचा रोजगार अशी आश्वासनं देण्यात आली आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात भाजप-शिवसेनेवर सडकून टीका केली.आपल्या देशाला दोन पंतप्रधानांची गरज आहे.नरेंद्र मोदी हे देशात कमी आणि परदेशात अधिक असल्याने ते आंतरराष्ट्रीय पंतप्रधान असल्याची टीका आंबेडकर यांनी केली. भाजपने राफेल विमानांच्या खाली ठेवलेले लिंबूचा प्रकार तर चिंता करण्यासारखा आहे.भाजपने केवळ आपला टीआरपी वाढवण्यासाठी फ्रांस सोबत 'डिल' केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.

भाजपच्या जाहिरनाम्यावर देखील प्रकाश आंबेडकरांनी जोरदार टीका केली.भाजपचा जाहीरनामा हा आमचा कॉपी केलेला जाहीरनामा असून दुष्काळमुक्त महाराष्ट्र,मोफत शिक्षण,स्वस्त वीज ही आमची आश्वासन भाजपने चोरल्याचा आरोप केला.आज नोकऱ्या गेल्या, कंपन्या बंद पडल्या,बँका बंद पडल्या असून भाजप सरकार पुन्हा आलं तर हे सरकार तुमच्या खिशातील पैसे देखील काढून घेईल.यामुळे या सरकारवर अंकुश ठेवलं गरजेचं असल्याचं ही आंबेडकर म्हणाले.

आज देशात मंदी आहे,शेतीमालाला भाव मिळत नाही,आर्थिक स्थिती चिंताजनक आहे यावर पंतप्रधान किंवा सरकारमधील मंत्री बोलायला तयार नाहीत.हजारो लोकं देश सोडून गेली आहेत.नरेंद्र मोदी देखील राहुल गांधींसारखे वागायला लागले आहेत.राहुल गांधी यांनी राफेल वर बोलू नये,डॉ मनमोहन सिंग जेव्हा राफेलवर बोलतील तेव्हा मोदी आपले कपडे फाडतील अस ही आंबेडकर म्हणाले.ट्रिपल तलाक काँग्रेस, एनसीपी थांबवू शकत होते पण त्यांनी थांबवलं नाही,यामुळे मुस्लीमांची फसवणूक झाली आहे.मुंबईतील मुस्लिमांनी ठरवलं तर मुंबईतील 13 जागांवर ते भाजव-शिवसेनेचा पराभव करू शकतात अस ही आंबेडकर पुढे म्हणाले.

WebTitle : it is not modi government it is mandi government says prakash ambedkar