सफाळ्यातील जैन युवक मंडळातर्फे गरजूंना मदत 

प्रमोद पाटील 
मंगळवार, 10 जुलै 2018

सफाळे - गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची व्यवस्था कोलमडून गेली आहे. सर्वच ट्रेन आज मंगळवारी (ता.10) पहाटे   जवळ जवळ 3 ते 4 वाजेपासून प्रत्येक स्टेशनमध्ये अडकून राहिल्या आहेत. सफाळे स्टेशनमध्ये देखील अवंतिका एक्सप्रेस सकाळी 5 वाजल्या पासून थांबलेली आहे. मुसळधार पावसाने बाजारपेठेत पाणी गेल्याने बाजारपेठ बंद आहे. तसेच सफाळे रेल्वे स्थानकावर सुद्धा कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याने लोक भुकेने व्याकुळ झाले असल्याचे भान लक्षात घेत.

सफाळे - गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची व्यवस्था कोलमडून गेली आहे. सर्वच ट्रेन आज मंगळवारी (ता.10) पहाटे   जवळ जवळ 3 ते 4 वाजेपासून प्रत्येक स्टेशनमध्ये अडकून राहिल्या आहेत. सफाळे स्टेशनमध्ये देखील अवंतिका एक्सप्रेस सकाळी 5 वाजल्या पासून थांबलेली आहे. मुसळधार पावसाने बाजारपेठेत पाणी गेल्याने बाजारपेठ बंद आहे. तसेच सफाळे रेल्वे स्थानकावर सुद्धा कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याने लोक भुकेने व्याकुळ झाले असल्याचे भान लक्षात घेत. खरया माणुसकीचे दर्शन घडवत सफाले येथील जैन युवक मंडळातील कार्यकर्ते, लहान मुले व सफाल्यातील ग्रामस्थांनी सफाळे रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांना सकाळी चहा व नाश्ता वाटप केला. 

तर पाऊस कमी होण्याची व रेल्वे सुरळीतपणे सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याने या अडकलेल्या प्रवाशांना दुपारी पुलाव भात देण्यात येईल असे निखिल शाह या तरूणाने सांगितले.

Web Title: Jain Youth Mandal in Safalai helps the needy