महाराष्ट्रात 'ठाकरे' सरकार ; जम्मू काश्मीरमध्ये लाडू वाटप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रात शिवसेना पुरस्कृत सरकार बनत असून  स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर विराजमान होत असल्याने जम्मू काश्मीर मध्ये जल्लोष करण्यात आला. जम्मू काश्मीर मधील शिवसेना नेत्यांनी लाडू वाटत बाईक रॅली काढून आपला आनंद व्यक्त केला.

मुंबई  : महाराष्ट्रात शिवसेना पुरस्कृत सरकार बनत असून  स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर विराजमान होत असल्याने जम्मू काश्मीर मध्ये जल्लोष करण्यात आला. जम्मू काश्मीर मधील शिवसेना नेत्यांनी लाडू वाटत बाईक रॅली काढून आपला आनंद व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्ष मनीष साहनी यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी एकत्र येत प्रेस क्लब परिसरात मिठाई वाटत ढोल-ताश्यांच्या तालात मिरवणूक काढली.रघुनाथ बाजारातून ही मिरवणूक काढण्यात आली यानंतर पुरानी मंडी परिसरात घोषणाबाजी करत परेड परिसरात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.

महाराष्ट्रात सहा दशकं शिवसेनेने लोकांची सेवा केली आहे.मोठ्या अपेक्षेने शिवसेनेने भाजपसोबत महायुती केली होती.मात्र भाजपने शिवसेनेची फसवणूक केली.भाजपचा अहंकाराला उद्धव ठाकरेंनी चोख प्रतिउत्तर देत थेट मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत.भाजपला शिवसेनेचा हे सणसणीत उत्तर असून यामुळे जम्मू काश्मीर मधील शिवसैनिकाना अत्यानंद झाल्याचे साहनी यांनी सांगितले.

Image may contain: 10 people, people smiling, crowd and outdoor

याचबरोबर राज्यातील प्रमुख नेते खासदार संजय राऊत, अनिल देसाई, एकनाथ शिंदे यांनी दिलेली झुंज आणि त्यांचा प्रयत्न यामुळे हे शक्य झाल्याचं सांगत त्यांनाही धन्यवाद देण्यात आले. यावेळी मिनाक्षी छिब्बर, अश्विनी गुप्ता , विकास बख़्शी, राकेश गुप्ता, संजीव कोहली यांच्यासह शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Web Title : jammu kashmir shivsena celebration after shivsenas victory in maharashtra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jammu kashmir shivsena celebration after shivsenas victory in maharashtra