'जनता अर्बन'ला दोन लाखांचा दंड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

मुंबई : वाई येथील जनता अर्बन को- ऑपरेटिव्ह बॅंकेला नियमांचा भंग केल्याप्रकरणी रिझर्व्ह बॅंकेने दोन लाख रुपयांचा दंड केला आहे.

मुंबई : वाई येथील जनता अर्बन को- ऑपरेटिव्ह बॅंकेला नियमांचा भंग केल्याप्रकरणी रिझर्व्ह बॅंकेने दोन लाख रुपयांचा दंड केला आहे.

बॅंकिंग नियामक कायदा 1949 च्या कलम 47 अ (1) आणि 46 (4) नुसार ही कारवाई करण्यात आली. रिझर्व्ह बॅंकेच्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. 2013- 14 मध्ये बॅंकेने त्याआधीच्या आर्थिक वर्षातील संपत्तीच्या तुलनेत 18.8 टक्के कर्ज दिले. रिझर्व्ह बॅंकेने एक जुलै 2013 रोजी जाहीर केलेल्या परिपत्रकात ही मर्यादा 15 टक्के घालून दिली आहे. याप्रकरणी रिझर्व्ह बॅंकेने बॅंकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याला बॅंकेने दिलेले लेखी उत्तर व प्रत्यक्षातील वस्तुस्थिती तपासल्यानंतर बॅंकेकडून नियमांचे उल्लंघन झाल्याने निदर्शनास आल्याने दंड केला आहे.

Web Title: janata urban bank: two lakh fine