जंजिरा रविवारपासून  पर्यटकांसाठी खुला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

राजपुरीचे सहायक बंदर निरीक्षक यशोधन कुलकर्णी यांनी सांगितले की, जंजिरा 
किल्ल्यावर प्रवासी वाहतूक करण्यासाठी यांत्रिकी होड्यांना रविवारपासून; तर शिडाच्या बोटींना 25 ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे. राजपुरी टर्मिनल येथे पर्यटकांसाठी अल्पोपाहार, शीतपेये आणि भोजनाच्या व्यवस्थेसाठी मुंबईतील बुन केटरिंग कंपनीची निविदा मंजूर झाली आहे. लवकरच पर्यटकांना सुविधा सुरू होणार आहे. 

मुरूड (बातमीदार) : वादळी वाऱ्यामुळे पावसाळ्यात जंजिरा किल्ल्यापर्यंतची बोट सेवा बंद करण्यात येते. ती रविवार (ता.1) पासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. राजपुरी आणि खोरा बंदरांतून ही सेवा असते. 

मुरूडपासून 5 किलोमीटरवर असलेल्या राजपुरी गावाच्या दक्षिणेस समुद्रात जंजिरा किल्ला आहे. 
राजपुरीचे सहायक बंदर निरीक्षक यशोधन कुलकर्णी यांनी सांगितले की, जंजिरा 
किल्ल्यावर प्रवासी वाहतूक करण्यासाठी यांत्रिकी होड्यांना रविवारपासून; तर शिडाच्या बोटींना 25 ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे. राजपुरी टर्मिनल येथे पर्यटकांसाठी अल्पोपाहार, शीतपेये आणि भोजनाच्या व्यवस्थेसाठी मुंबईतील बुन केटरिंग कंपनीची निविदा मंजूर झाली आहे. लवकरच पर्यटकांना सुविधा सुरू होणार आहे. 
किल्ल्यात साफसफाईचे काम सुरू केले आहे, असे किल्ला स्मारक परिचर प्रकाश घुगरे यांनी "सकाळ'ला सांगितले. 

असा आहे किल्ला 
जंजिरा हा साडेतीनशे वर्षांपूर्वी तब्बल 22 एकरवर हा किल्ला बांधलेला आहे. कोकण किनारपट्टीवरील पाच जलदुर्गांपेैकी एक आहे. वास्तुशिल्पाचा तो अजोड नमुना आहे. 22 बुरुजांची भक्कम तटबंदी, शत्रूपक्षाला सहजासहजी न दिसणारे प्रवेशद्वार हे स्थापत्य शास्त्राची साक्ष देते. छोट्या पडद्यावरील "स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेत कोंडाजी फर्जंद आणि जंजिरा किल्ल्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. त्यामुळे सध्या जिज्ञासा युवकांमध्येही या किल्ल्याविषयी उत्सुकता असल्याने पर्यटकांची संख्या वाढेल, असे सांगण्यात येते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From Janjira Sunday Open to tourists