दिवस रात्र खांद्यावर वीणा घेऊन जन्माष्टमी सप्ताह साजरा

Janmashtami week celebrated at saralgaon thane
Janmashtami week celebrated at saralgaon thane

सरळगांव (ठाणे) - मुरबाड तालुक्यातील गोविंदा दहिहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुरबाड तालुक्यात जन्माष्टमीचा सण मोठ्या भक्ती भावाने संपन्न होत असतो. शहरी भागाप्रमाणे तालुक्यातील मंडळांच्या माध्यमातून उंच हंडी बांधून उत्सव साजरा केला जातो. उंच हंड्या बांधल्या जात असल्याने त्या फोडण्याचा सरावही ग्रामीण भागातील गोविंदा वर्षभर करीत असतात.

मुरबाड शहरात राजकीय पक्षांच्या वतीने दरवर्षी हंड्या बांधल्या जातात. मुरबाड शहरातील हनुमान मंदिरात 41 वर्षाच्या परंपरेनुसार वैश्यसमाजाच्या वतीने जन्माष्टमी उत्सव साजरा केला जातो. यावर्षी सप्ताह सुरू असून रोज रात्री भजन, किर्तन व विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. या सप्ताहात सात दिवस वीणा जमिनीवर न ठेवता अखंडपणे दिवस रात्र खांद्यावर उभा घेऊन नामस्मरण केले जाते. ही सेवा मिळण्यासाठी वयोवृध्दांपासून ते तरूण वर्गापर्यंत चडावड लागली जाते. 

जन्माष्टमीच्या दिवशी हनुमान मंदिरात दहिहंडी फोडून दुपारी काल्याचा कार्यक्रम होतो. या काल्याच्या कार्यक्रमात 2 ते 3 हजार भाविक प्रसादाचा लाभ घेतात अशी माहिती हनुमान मंदिराचे ट्रस्टी मोहन दुगाडे व वैश्य युवक मंडळाचे अध्यक्ष सुधीर तेलवणे यांनी दिली. या दिवशी वैश्यसमाज घरी जेवण न करता काल्याच्या प्रसादाचा लाभ घेतात.  
             

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com