धर्मादाय आयुक्ताच्या भितीने जसलोक हॉस्पिटलने केले रूग्णाचे साडेचार लाख परत

विजय गायकवाड
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

धर्मदाय आयुक्तांनी कारवाईचा इशारा देताच जसलोक हॉस्पिटलने संबंधित रूग्णाचा मोफत उपचार केला.

मुंबई - जसलोक रूग्णालयात ब्रेन स्ट्रोकच्या आजारावर उपचार घेत असेलल्या बीपीएल रूग्णाचे साडेचार लाख रूपये रूग्णालयाने परत केले. धर्मदाय आयुक्तांनी कारवाईचा इशारा देताच जसलोक हॉस्पिटलने संबंधित रूग्णाचा मोफत उपचार केला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे मदत मागणाऱ्या रूग्णांच्या कुटूंबियांना कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या धडपडीने लाख मोलाच्या मदतीची कमाल झाली.

संदीप सुनिल सरोदे वय 25  (रा. वाघ वस्ती शिर्डी जि. अहमदनगर) या तरूणावर मुंबई येथे जसलोक हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. तब्बल 35 दिवस उपचारासाठी एकूण साडेचार लाख रुपये संदिपच्या कुटूंबियांनी भरले होते. डिस्चार्जची वेळी 9 हजार रूपये भरल्याशिवाय पेशंटला सोडणार नसल्याचे हॉस्पिटलने सांगितले. त्यामुळे संतोषच्या कुटूंबियांनी मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्य निधीकडे घाव घेतली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी माहिती घेतल्यावर त्यांना संतोषकडे रेशनकार्ड पिवळे असल्याचे कळाले. म्हणजेच संतोष बी पी एल (दारिद्रय रेषेत) अंतर्गत सामाविष्ठ व्यक्ती होता. ज्यास महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 कलम 41 (अ) अन्वये मोफत उपचाराची तरतूद आहे. 

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे अधिकारी ओमप्रकाश शेटे हे धर्मादाय रूग्णालय देखरेख समितीवर सदस्य आहेत. त्या समितीचे धर्मादाय आयुक्त अध्यक्ष आहेत. त्या अखत्यारीत लाखो रूग्णानांना तब्बल तीन वर्षात 648 कोटी रूपयाचे मोफत ऊपचार करता आले. 

ओमप्रकाश शेटे यांनी हॉस्पिटल प्रशासनास दि 14 मार्चला पत्र दिले की संदिपला महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कलमान्वये तो बीपीएल धारक असल्यामुळे मोफत उपचार करावयास होते. परंतु का केले नाहीत, असे पत्र दिले. 

हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले की हा रूग्ण गेली 35 दिवस येथे उपचार करतोय. परंतु कायदयाने बोट ठेवल तर 10 दिवसात पिवळ किंवा केशरी शिधापत्रिका किंवा तहसीलचा उत्पन्नाचा दाखला दयायला हवा होता तो त्यांनी जमा केला नव्हता. संदीपच्या बरोबर पिवळे रेशन कार्ड व त्यावर बीपीएल म्हणजे ते कुटुंब दारिद्रय रेषेचा दाखला होता व त्यांनी एकवेळेस तो हाॅस्पिटलसध्ये दाखविण्याचा प्रयत्न केला. परंतु काही दाद लागली नाही. शेवटी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी कायद्याचा बडगा उगारताच जसलोक हॉस्पिटलने संपुर्ण उपचार मोफक केला व संदिप सरोदे यांचे साडेचार लाख रूपयेही परत केले.

कोण होता संदिप सरोदे?
संदिप सरोदे हा शिर्डी येथे साई मंदीराबाहेर फूल विकून स्वतःच्या कुटूंबाची गुजराण करत होता. संदिपचे लग्न 1 वर्षापूर्वी झाले आहे. त्याचा मेहुणा सतीश थोरात हा त्याच्या उपचाराकरीता म्हणजे स्वतःच्या बहीणीच्या कुंकवाकरीता पैश्याची जुळवाजुळव करत असताना त्याचे स्वतःच लग्न 1 महीन्यावर येऊन ठेपलं आहे. परंतु होणाऱ्या बायकोचे दागिने विकले व 3 लाख रूपये व उर्वरीत दिड लाख रूपये नातेवाईक व मित्रपरीवाराकडून उसने घेतलं. 4 एक्कर शेतीचा मालक सतीश मात्र पुरता हवालदील झाला होता कारण बहीणीचं कुंकु वाचले. पण 94000 रूपये भरून संदीपचा डिस्चार्जची तरतूद कशी करावी याची चिंता सतावत होती.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Jaslok Hospital returned the amount of Rs four and half lakh to the patient