जावेद अख्तर आणि कंगना राणावत मानहानी खटला; पुढील सुनावणीला आरोप निश्चिती? | Kangna ranaut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kangana ranaut-javed akhtar

जावेद अख्तर आणि कंगना राणावत मानहानी खटला; पुढील सुनावणीला आरोप निश्चिती?

मुंबई : गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी अभिनेत्री कंगना राणावत (kangana ranaut) विरोधात केलेल्या मानहानीच्या खटल्यात (defamation case) पुढील सुनावणीला आरोप निश्चित (allegation confirmation) होण्याची शक्यता आहे. अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात (Andheri court) अख्तर यांनी कंगनाविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

हेही वाचा: मुंबई : सराईत गुन्हेगाराने केली महिलेची हत्या; १२ दिवसांनी पोलिसांच्या ताब्यात

यावर नुकतीच न्यायालयात सुनावणी झाली. हा दावा अन्य न्यायालयात वर्ग करण्याची कंगनाची मागणी किल्ला न्यायालयाने अमान्य केली आहे. त्यामुळे याविरोधात सत्र न्यायालयात अपील करणार आहे, असे कंगनाच्या वतीने वकील रिझवान सिद्दीकी यांनी न्यायालयात सांगितले. सुनावणीमध्ये गैरहजर राहण्याची विनंती कंगनाच्या वतीने करण्यात आली. याला अख्तर यांच्याकडून वकील जय भारद्वाज यांनी विरोध केला.

दंडाधिकारी आर आर खान यांनी पुढील सुनावणी ता 13 डिसेंबर रोजी निश्चित केली. पुढील सुनावणीमध्ये खटल्याची कारवाई आणि आरोप निश्चितीवर सुनावणी होणार आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने एका व्रुत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अख्तर यांच्यावर निराधार आरोप केले आहेत, असा दावा अख्तर यांनी केला आहे.

loading image
go to top