जिद्दीला सलाम!  कृत्रिम पायांसह कोब्रा कमांडो पुन्हा देश सेवेत 

जवान कृत्रिम पाय.jpeg
जवान कृत्रिम पाय.jpeg

मोखाडा  ः देशाची सेवा करताना आपले दोन्ही पाय नक्षलवाद्यांच्या बॉम्ब हल्ल्यात गमावून बसलेले, तरीही देशसेवेसाठी कायम तत्पर असणारे जव्हार तालुक्‍यातील वडोली रातोनापाडा या अतिदुर्गम आदिवासी भागातील कोब्रा कमांडो रामदास भोगाडे हे कृत्रिम पाय बसवून पुन्हा देशसेवेत दाखल झाले आहेत.

आपले अर्धवट राहिलेले पदवीधर शिक्षण पुर्ण करण्यासाठी, पुन्हा नव्या उमेदीने त्यांनी मोखाड्यातील खोडाळा येथील मोहिते महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्रात तृतीय वर्ष कला शाखेत आपला प्रवेश घेतला आहे. 
जव्हार तालुक्‍यातील वडोली रातोनापाडा या आदिवासी भागातून एक उमदा तरुण देशाच्या सीआरपीएफ विशेष फोर्स संरक्षण तुकडीत दाखल झाल्यानंतर विशिष्ट नेतृत्वगुण आणि कौशल्यात नैपुण्य, नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवीली. कोब्रा कमांडो रामदास भोगाडेंच्या तुकडीत एकूण 26 जवान असल्याने नक्षलवाद्यांशी सामना करून

आपल्या जवानांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. 29 नोव्हेंबर 2017 ला छत्तीसगड राज्यातील सुकमा येथे झालेल्या नक्षलवाद्यांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात रामदास यांचे दोन्ही पाय निकामी झाले.परंतु, दोन्ही पायाने अपंगत्व आलेल्या कोब्रा कमांडो रामदास भोगाडे यांची देशाची सेवा करण्याची इच्छाशक्ती प्रबळ होती. आज दोन्ही पाय विकलांग असताना त्यांनी कृत्रिम पाय लावून पुन्हा भोगाडे देशसेवेत दाखल झाले आहेत. सध्या ते मध्यप्रदेशमधील बालाघाट येथे देशसेवेसाठी तैनात आहेत. 

थोडी लक्षणं दिसली तरी लगेच उपचार करा, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
- पदवीचे शिक्षण पुर्ण करणार 
देशाची सेवा करताना आपले अर्धवट राहिलेले पदवीधर शिक्षण पूर्ण करण्याची नवी उमेद रामदास भोगाडे यांच्यात जागृत झाली. खोडाळा येथील मोहिते महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्रात तृतीय वर्ष कला शाखेत प्रवेश घेतला आहे. अशा अवस्थेत शिक्षण घेऊन देशसेवा करण्याच्या कार्याचे कौतुक गिरीवासी सेवा मंडळाचे सचिव प्रा.दीपक कडलग, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.यशवंत शिद, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवर्तन काशीद यांनी करत त्यांच्या जिद्दिला सलाम केला आहे. 


जव्हार-मोखाड्यासारख्या अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी खूप शिकून आपल्या आईवडिलांचे नाव उज्वल करावे. जे विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या तंदुरस्त असतील त्यांनी आपले आयुष्य देश सेवेसाठी खर्च करावे. मला ज्या पायांनी कोब्रा कमांडो बनवलं ते आज माझ्याकडे नाहीत. तरीही मला देशाची सेवा करण्याची प्रचंड उमेद आहे. 
- कोब्रा कमांडो, रामदास भोगाडे.  

Jawan Ramdas Bhogade returns to service with prosthetic legs?amp

( संपादन ः रोशन मोरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com