esakal | ब्रेकिंग : शरद पवारांसोबतची अजित दादा आणि जयंत पाटलांची बैठक संपली, पार्थ पवारांबद्दल पाटील म्हणालेत...
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेकिंग : शरद पवारांसोबतची अजित दादा आणि जयंत पाटलांची बैठक संपली, पार्थ पवारांबद्दल पाटील म्हणालेत...

आम्ही काही प्रश्नांवर चर्चा करायला अधून मधून भेटत असतो - जयंत पाटील 

ब्रेकिंग : शरद पवारांसोबतची अजित दादा आणि जयंत पाटलांची बैठक संपली, पार्थ पवारांबद्दल पाटील म्हणालेत...

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरलाय. कारण राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतः आपले नातू पार्थ पवार यांच्यावर आपलं रोखठोक मत मांडलं. शरद पवारांच्या पार्थ यांच्याबद्दलच्या मतानंतर आज संध्याकाळी शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी म्हणजेच सिल्व्हर ओकमध्ये राष्ट्रवादीची बैठक पार पडली.

सकाळीच आलेल्या विधानानंतर संध्याकाळी घेण्यात येणारी बैठक अत्यंत महत्त्वाची असल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी मांडलं. दरम्यान, साधारण दोन तास सुरु असलेली बैठक आता संपली असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अजित पवार आणि राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सिल्व्हर ओक मधून बाहेर पडले आहेत. या बैठकीला सुप्रिया सुळे या देखील उपस्थित असल्याचं समजतंय. 

मोठी बातमी - मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अजित पवार लवकर निघून गेलेत, यावर जितेंद्र आव्हाड म्हणतात...

शरद पवार यांना विचारण्यात आलेला प्रश्न : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात तुमचे नातू पार्थ पवार यांनी स्वतः CBI तपासणीची मागणी केली आहे, तुमचं यावर काय मत 

शरद पवार यांनी दिलेलं उत्तर : माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाही, ते इमॅच्युअर आहेत. परंतु CBI ची चौकशी कुणाला करायची असेल तर मी स्पष्टपणे सांगतो की, माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर शंभर टक्के विश्वास आहे. कुणाला असं वाटत असेल की CBI ची चौकशी करावी, त्यांनाही काही विरोधाचं कारण नाही.

बैठकीनंतर काय म्हणालेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ? 

माध्यमांना प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आम्ही काही प्रश्नांवर चर्चा करायला अधून मधून भेटत असतो. मात्र आज झालेल्या बैठकीत पार्थ पवार प्रकरणावर कोणतीही चर्चा झालेली नाही, असं जयंत पाटील माध्यमांना म्हणालेत. राज्यात वेगवेगळे प्रश्न आहेत, राज्यातील अनेक प्रश्न आहेत त्यावर आज चर्चा झाल्याचं पाटील म्हणालेत.

VIDEO पाहा : शरद पवारांनी सुनावलं, म्हणालेत "माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाही"

आज संध्याकाळी बैठक घ्यायची हे कालपासून ठरलं होतं. या प्रकरणावरून अजित पवारही नाराज नसल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. पार्थ पवारांच्या विषयावर चर्चाच झाली नाही असं जयंत पाटील यांनी माध्यमांना स्पष्ट केलं. शरद पवार हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत आणि त्यांना कुणालाही सल्ला, सूचना किंवा आदेश देण्याचा अधिकार आहे. दरम्यान याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्थ  पवार यांच्याकडून कोणतंही स्पष्टीकरण मागणार नाही, हेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. 

jayant patil after meeting with sharad pawar and ajit pawar at silver oak