भाजप राष्ट्रवादी नेत्यांच्या मागे लागली आहे : जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे लागली आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

मुंबई : भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे लागली आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

आमचे नेते खेचण्यासाठी सर्व मार्गाने प्रयत्न केले जात आहेत. सरकारी यंत्रणांची मदत घेतली जात आहे असा आरोप करतानाच भाजपने दुसरा पक्ष फोडण्यापेक्षा काम केले असते तर जनतेचा आशिर्वाद मिळाला असता असा टोला जयंतराव पाटील यांनी भाजपला लगावला आहे.

अनेक लोकं भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर आहे. जेव्हा जेव्हा नेत्यांनी अशा प्रकारे पक्ष बदलला आहे तेव्हा तिथल्या जनतेने त्या नेत्यांना धडा शिकवला आहे याची जाणीव जाणाऱ्या लोकांना करुन दिली.इतर पक्ष अशाप्रकारे फोडला जात आहे हे भाजपचे कमकुवतपणाचे उदाहरण आहे असेही जयंत पाटील म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jayant patil attacks bjp