‘भयाने नामोहरम करण्याचा प्रयत्न’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे आमदार हसन मुश्रिफ यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे छापे टाकून सरकारकडून मुश्रिफ यांच्यासारख्या सच्च्या नेत्याला भय दाखवायचे प्रयत्न होत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे आमदार हसन मुश्रिफ यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे छापे टाकून सरकारकडून मुश्रिफ यांच्यासारख्या सच्च्या नेत्याला भय दाखवायचे प्रयत्न होत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला.

सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या, सरकारी निवेदनाला बगल देणाऱ्या, तसेच सरकारी पक्षाच्या आग्रहाला जो बळी पडणार नाही त्याच्यामागे शुक्‍लकाष्ठ लावण्याचे धोरण सत्ताधारी करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. हसन मुश्रिफ हे सच्च्या कार्यकर्त्यांमधील नेते आहेत  असे पाटील म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुश्रिफ यांना भाजपत येण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यांनी ते फेटाळून लावत प्राण असेपर्यंत शरद पवार यांना सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मुश्रिफ यांच्या या निष्ठेमुळेच छापे टाकून भयभीत करण्यात येत असल्याची टीका ‘राष्ट्रवादी’ने केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayant Patil Talking Politics