जयंत पाटील म्हणतात, ‘टायगर अभी जिंदा है’, ‘पिक्चर अभी बाकी है’; पण "कटप्पाने बाहुबली को क्यू मारा" हे उत्तर त्यांना मिळालेलं नाही

सुमित बागुल
Friday, 23 October 2020

कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केलं.

मुंबई : आज एकनाथ खडसे यांनी आपली चाळीस वर्षांची भाजपसोबतची वाटचाल मागे सारत सीमोल्लंघन केलंय. एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी पक्षात अधिकृतरीत्या प्रवेश केलाय. एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशावेळी राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते मुंबईच्या NCP कार्यालयात उपस्थित होते. स्वतः शरद पवारांनी खडसे जे बोलतात ते करून दाखवतातच असा विश्वास खडसेंवर टाकलाय. कोरोनाचे सर्व नियम शिथिल झाल्यावर जळगावमध्ये शक्तिप्रदर्शन देखील केलं जाईल आणि महाराष्ट्राला खडसेंची ताकद दाखवली जाईल असं सूचक विधान शरद पवारांनीकेलं. 

कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. गेल्या चार पाच वर्षात महाराष्ट्रातील विरोधकांना अडचणीत आणण्याचं राजकारण राज्याने पाहिलं. राज्याची तशी संस्कृती नाही. आम्ही शरद पवारांकडून सुसंस्कृत राजकारण शिकलो यशवंत राव चव्हाण यांनी ते राज्यात रुजवलं, असं जयंत पाटील म्हणालेत.

महत्त्वाची बातमी : 40 वर्षांनंतर खडसेंचं सीमोल्लंघन, नाथाभाऊंचा राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षात प्रवेश !

पुढे बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवर टीकेचे बाण सोडलेत, जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हंटल की, भाजपच्या काळात पहिल्या रांगेतील नेत्याला सभागृहातील मागच्या रांगेत बसवण्याचं झालं. नाथाभाऊंवरील अन्यायावर सभागृहात सर्वात जास्त मीच बोललो. "कटप्पाने बाहुबली को क्यू मारा, असा प्रश्न मी विचारला, पण त्याचं उत्तर मला अजूनही मिळालं नाही.आजही ते टीव्ही पाहात असतील तर त्यांना कळालं असेल की ‘टायगर अभी जिंदा है’, ‘पिक्चर अभी बाकी है’. 

jayant patils speech while eknath khadases NCP joining event


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jayant patils speech while eknath khadases NCP joining event