उल्हासनगरात रोडवरील 30 अनधिकृत अतिक्रमणांवर जेसीबी

दिनेश गोगी
बुधवार, 5 डिसेंबर 2018

उल्हासनगर - शांतीनगरातील साईबाबा मंदिर ते डॉल्फिन हॉटेल रोडवरील सुमारे 30 अनधिकृत अतिक्रमणांवर आज उल्हासनगर पालिकेने जेसीबी मशीन फिरवून ही अतिक्रमणे भुईसपाट केली.

उल्हासनगर - शांतीनगरातील साईबाबा मंदिर ते डॉल्फिन हॉटेल रोडवरील सुमारे 30 अनधिकृत अतिक्रमणांवर आज उल्हासनगर पालिकेने जेसीबी मशीन फिरवून ही अतिक्रमणे भुईसपाट केली.

हा रोड 80 फुटाचा असून काही व्यापारी, गॅरेजधारक व नागरिकांनी रोडच्या काही भागांवर अतिक्रमण करून रोड व्यापण्याचा प्रकार सुरू केला होता. अशा तक्रारी येऊ लागताच पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी ही सर्व अतिक्रमणे भुईसपाट करण्याचे आदेश अतिक्रमण-अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाचे प्रमुख व प्रभाग समिती 3 चे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांना दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करताना गणेश शिंपी, सहाय्यक आयुक्त अजित गोवारी, भगवान कुमावत, दत्तात्रय जाधव यांच्या सोबत मुकादम श्यामसिंग, विश्वनाथ राठोड, विलास मुंडे, मधुकर थोरात, ज्ञानेश्वर दुभेळे यांनी साईबाबा मंदिर-डॉल्फिन रोड गाठून जेसीबी मशीन द्वारे सर्व अतिक्रमणे भुईसपाट केल्याने या रोडने अतिक्रमणाच्या विळख्यातून मोकळा श्वास घेतला आहे.

रोडवर अनधिकृत अतिक्रमण करण्याचा किंबहूना शेड बांधून रोड व्यापण्याचा प्रकार निदर्शनास आल्यावर किंवा तक्रारी मिळाल्यावर आयुक्त अच्युत हांगे यांच्या आदेशान्वये अशा अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गणेश शिंपी यांनी दिली.

Web Title: JCB on 30 unauthorized encroachments in Ulhasnagar