मुंबईतले जीना हाउस तत्काळ पाडा - नवाब मलिक 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 मे 2018

मुंबई - भारत - पाकिस्तानच्या फाळणीला जबाबदार असलेले मोहम्मद अली जीना यांचा मुंबईतील बंगला सरकारने तातडीने पाडून टाकावा. मुख्यमंत्र्यांनी हा धाडसी निर्णय घेतल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस मुख्यमंत्र्याचा जाहीर सत्कार करण्यास तयार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी आज केले. भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी या जीना हाउसबद्दल मुख्यमंत्र्याकडे केलेल्या तक्रारीचे राष्ट्रवादीने आज समर्थन केले. 

जीना हाउसबाबत भाजपच्या नेत्यामध्ये तीव्र संताप असला, तरी जीनांचे भूत बाहेर काढून राजकारण करू नये. जीनांच्या नावाने देशातल्या मुख्य समस्यांना बगल देत भाजप स्वत:चे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही मलिक यांनी केली. 

अलीगढ विद्यापीठामध्ये जीनांचा फोटो आहे. या विद्यापीठाची सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येते. असे असताना या मंत्रालयाने आजपर्यंत तो फोटो का काढला नाही, असा सवाल मलिक यांनी या वेळी केला.

Web Title: Jeena house in mumbai Nawab Malik