एकविरा देवीचे दर्शन करून येताना जीपचा अपघात, 12 जखमी

अनिल पाटील
सोमवार, 22 एप्रिल 2019

खोपोली - एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास करणाऱ्या पेण येथील भक्तांची जीप बोरघाटातून खोपोलीकडे येताना रविवारी (ता.21) मोठा अपघात घडला. या अपघातात  जीपमधील 12 प्रवासी जखमी झाले असून, यातील चार जण गंभीर आहेत. ब्रेक निकामी झाल्याने खोपोली पोलिस ठाण्याच्या नजीक असणाऱ्या गतिरोधकावरून आदळून गाडीवरील ताबा सुटल्याने जीप दुसऱ्या बाजूला जाऊन पलटी झाल्याने हा अपघात घडला. अपघातस्थळी गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला. सर्व जखमींना खोपोली पालिका रुग्णालयात उपचार देऊन पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, यात्रे निमित्ताने मुंबई अलिबाग पेण आदी भागातून अनेक कुटुंब कार्ला येथील एकविरा देवीच्या दर्शनासाठी कुटूंबासहित जात आहेत. पेण  रोडे येथील कुटुंब जीप क्र. एम.एच. 06 बी.जी. 4678 हिने शनिवारी कार्ला येथे एकविरा देवीच्या दर्शनाला गेले होते. रविवारी दुपारी एकच्या सुमारास परतीचा प्रवास करीत असताना बोरघाटातून जुन्या मार्गाने खोपोली बाजूकडून पेण कडे जाण्यासाठी जीप येत असताना, दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास बोरघाट उतरून खोपोली बस स्थानकासमोर आल्यावेळी जीपचे ब्रेक निकामे झाल्याने चालकाचा गाडीवरी ताबा सुटला. येथे असणाऱ्या गतिरोधक वर आदळून जीप रस्ता सोडून खोपोली शहरातील प्रवेशव्दाराकडे वळून पलटी झाल्याने हा अपघात घडला. 

या अपघातात मानसी दिनकर म्हात्रे, सानिया जगदीश म्हात्रे (रा मुंबई), मनीषा सदाशिव पाटील (52), साक्षी पांडुरंग पाटील, सूरज गणू पाटील, संजना हरीचंद्र पाटील, जयेश मधुकर म्हात्रे, प्रशाली मच्छिन्नद्र जाभळे, अक्षय हरीचंद्र पाटील, नम्रता सोमा म्हात्रे, नितीन जाभले, यश पाटील, अर्णव नितीन जाभले (वय 7 महिने). आलीशा नितीन जाभले वय (11) हे बारा जण जखमी झाले. ते रोडे पेण तालुक्यातील रहिवासी आहेत. यातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांना बोरघाटातील वाहतूक पोलिस, खोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के.एस. हेगाजे यांच्यासह पोलिस कर्मचारी व खोपोलीतील अपघातग्रस्त ग्रुपने मदत करून खोपोली नगरपालिका डॉ. बाबासाहेब आबेडकर रुग्णालयात दाखल करून या सर्व जखमींवर तत्काळ उपचार व्यवस्था केली. तसेच त्यांच्या नातेवाईकांना बोलावुन सर्व जखमींना त्यांच्या ताब्यात दिल्याने पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

Web Title: Jeep accident, 12 injured when visiting Ekvira Devi