Photo : 'या' उडत्या सशाला मिळाली 640 कोटींची किंमत..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 January 2020

  • या उडत्या सशाला इतकी किंमत का?
  • हे आहे जगातलं सर्वात महाग शिल्प

हे वर्ष कला क्षेत्रासाठी काहीसं खास ठरलं. कारण या वर्षात एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली. या विक्रमात एक ससा आहे. ज्याची किंमत आहे तब्बल 640 कोटी रुपये.

​उडणारा ससा, उंची 41 इंच. म्हणजेच जवळपास 1 मीटर आणि किंमत 91 मिलियन डॉलर  म्हणजेच सुमारे 640 कोटी. ही किंमत ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्यात असतील. कारण स्वाभाविक आहे आता 91 मिलियन म्हटलं की त्यात किती शून्य येतात इथपासून आपली सुरुवात होते. पण या सशामध्ये इतकं काय आहे खास?

मोठी बातमी :  दिल्लीतील मातोश्रींच सेनेला ऐकावं लागतं - देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

तर हा ससा म्हणजे एक शिल्प आहे. जगविख्यात शिल्पकार जेफ कून्स यांनी हे शिल्प साकारलंय. 1986 मध्ये कून्स यांनी या शिल्पाची निर्मिती केली होती. यावर्षी झालेल्या लिलावात या उडणाऱ्या सशाला विक्रमी किंमत आली आणि अनेकांचे डोळे विस्फारले. हयात असलेल्या कुठल्याही कलाकाराच्या कलाकृतीसाठी मोजलेली ही सर्वाधिक किंमत आहे.

No photo description available.

मोठी बातमी :  मेड इन चायना #TikTok वर आता अमेरिकेत बंदी

यापूर्वी नोव्हेंबर 2018 मध्ये डेव्हिड हॉकनेसचं एक पोट्रेट 634 कोटींना विकलं गेलं होतं. तो विक्रम या उडत्या सशाने मोडलाय. गंमत म्हणजे डेव्हिड यांनी जेफ कून्स यांचा रेकॉर्ड मोडून हा विक्रम आपल्या नावे केला होता. कारण 2013मध्ये कून्स यांचा बलून डॉग तब्बल 410 कोटींना विकला गेला होता. आता कून्सच्या या सशाने ही शर्यत पुन्हा जिंकली आणि पुन्हा आपल्या निर्मात्याला अव्वल स्थानी नेऊन ठेवलं. कला विश्वातली ही हेल्दी स्पर्धा यंदाच्या वर्षी कलाप्रेमींना पाहायला मिळाली.

WebTitle : Jeff Koons Rabbit sculpture breaks record for living artist


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jeff Koons Rabbit sculpture breaks record for living artist