दागिन्यांची तस्करी करणाऱ्या शिक्षिकेला अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

मुंबई - सोन्याच्या दागिन्यांची तस्करी करणाऱ्या फरीदा जझर हाजुरी (वय 44) या शिक्षिकेला शुक्रवारी महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) मुंबई विमानतळावरून अटक केली.

मुंबईतील एका नातेवाइकाच्या मदतीने आरोपी महिला तस्करांच्या संपर्कात आली होती. हे दागिने विमानतळाबाहेर आणून दिल्यानंतर महिलेच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल, असे तिला सांगण्यात आले होते.

फरिदा वसईतील साईनगरात राहते. सहार विमानतळावरील "टर्मिनल 2'च्या ग्रीन सिग्नलजवळ आल्यानंतर तिला "डीआरआय'च्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी ताब्यात घेतले. "आपण दुबईत काम शोधण्यासाठी गेलो होतो,' असे तिने चौकशीत सांगितले. तिच्या बॅगेतील प्लॅस्टिक कागदात गुंडाळलेले सुमारे सहा किलो 53 ग्रॅमचे दागिने जप्त करण्यात आले.

ही महिला भारतीय पारपत्रावर दुबईहून मुंबईत आली होती. तिच्याकडून "ऍपल' कंपनीचा महागडा मोबाइलही जप्त करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. ही महिला मुंबईतील एका नातेवाइकामुळे या सोन्याची तस्करी करणाऱ्याच्या संपर्कात आली होती. त्याने तिला दुबईत पाठवून तेथील एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. तिथे तिला हे दागिने दिले व मुंबई विमानतळाबाहेर एका व्यक्तीकडे देण्यास सांगण्यात आले होते. तसे करण्यापूर्वीच तिला अटक करण्यात आली.

Web Title: jewellery smuggler teacher arrested