शेतकरी सुकाणू समितीचा राज्यभरात जेलभरो सत्याग्रह

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनी अर्थात 14 मे रोजी राज्यव्यापी जेलभरो शेतकरी सत्याग्रह करण्यात येणार आहे.
 

मुंबई - राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्य शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनी अर्थात 14 मे रोजी राज्यव्यापी जेलभरो शेतकरी सत्याग्रह करण्यात येणार आहे.

या सत्याग्रहात राज्यभरातील सुमारे दोन लाख शेतकरी सहभागी होणार असल्याचे सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथदादा पाटील यांनी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केल्यानंतर राज्यात सुमारे 2 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचा दावा रघुनाथदादा पाटील यांनी केला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळावी, वीज बिल मुक्ती मिळावी, शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा इतका हमी भाव मिळण्याची स्वामीनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, शेतकरी विरोधी आयात निर्यात धोरण बदलणे अशा विविध मागण्यांसाठी हा सत्याग्रह करण्यात येणार आहे. राज्यभरात तालुका, जिल्हा आणि पोलीस स्टेशन बाहेर हा सत्याग्रह होणार आहेत. या सत्याग्रहाला कामगार संघटनांसह विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Jhel Bharo Satyagraha of the Farmer Sukanu Committee across the state