जिया खान प्रकरणाचा निकाल राखून ठेवला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

मुंबई - अभिनेत्री जिया खान हिच्या मृत्यूप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करणाऱ्या जियाच्या आई राबिया खान यांच्या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. उच्च न्यायालयाचे न्या. रणजित मोरे आणि न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. सरकारी पक्ष, सीबीआय आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाल्याने खंडपीठाने निकाल राखून ठेवला.

स्थानिक पोलिस या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करत नसल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी राबिया खान यांनी याचिकेत केली आहे. 3 जून 2013 रोजी 25 वर्षीय जिया खानने जुहू अपार्टमेंटमध्ये गळफास घेतल्याचे आढळले होते. जियाचा प्रियकर सूरज पांचोली याने तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप राबिया खान यांनी केला आहे. दरम्यान, जियाचा मृतदेह ज्या स्थितीत आढळून आला, त्यानुसार तिच्या गळ्यावर इंग्रजी "व्ही' आकाराची खूण दिसली पाहिजे. मात्र, शवविच्छेदन अहवालात तिच्या मानेवरसुद्धा अशी खूण आढळून आली आहे. शवविच्छेदन अहवाल स्थानिक डॉक्‍टर; तसेच एका परदेशी डॉक्‍टरसह आणखी दोघांना दाखवला असता हा सदोष मनुष्यवध असल्याचा निष्कर्ष निघाला, अशी माहिती राबिया खान यांच्या वकिलांनी दिली. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या सर्व पुराव्यांच्या आधारावर सर्व तपास पूर्ण केल्याचे सीबीआयच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले. न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवत असल्याचे जाहीर केले. त्यावर खंडपीठाने आपल्याला न्याय द्यावा, असे भावूक होत राबिया खान म्हणाल्या. सुनावणी संपल्यानंतरही न्यायालय परिसरात त्या बराच वेळ रडत होत्या.

Web Title: Jiah Khan case verdict reserved