जिया खानच्या आईच्या ट्विटना पंचोलींचा आक्षेप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

मुंबई - अभिनेत्री जिया खान हत्येबाबत तिच्या आईने सोशल मीडियावर बदनामी करणारा मजकूर प्रसिद्ध केला आहे, अशी तक्रार अभिनेता आदित्य पंचोली व त्याच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. ट्विटरवर राबिया खान यांनी केलेल्या 18 ट्विटविरोधात पंचोली यांनी नाराजी व्यक्त केली. अशाप्रकारे बदनामी करण्यास खान यांना मनाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप अभिनेता सूरज पंचोलीवर आहे. याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. खान यांनी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. पंचोली यांच्या याचिकेवर जानेवारीत सुनावणी होणार असून, अशी बदनामी न करण्याची हमी खान यांनी यापूर्वी न्यायालयात दिली होती.
Web Title: Jiah Khan's mother objected to tweet pancoli