राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी पोलिस अधिकाऱ्याला भरला दम; म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्या हॉटेलमध्ये होते तिथं संबंधित पोलिस अधिकारीही होता.

- याबाबत समजल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पोलिस अधिकाऱ्याकडे ओळखपत्राची मागणी करत चांगलाच दम भरला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सध्या हॉटेल रेनिन्ससवर तळ ठोकून आहेत. या हॉटेलमध्ये साध्या वेशातील पोलिस आढळले. त्यामुळे खळबळ उडाली. साध्या वेशातील पोलिस अधिकाऱ्यांना गाठून राष्ट्रवादीच्या आमदारांनी चांगलाच दम भरला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

एका चॅनलवर याचे थेट चित्रण दाखवण्यात आले. त्यामध्ये साध्या वेशातील पोलिस अधिकाऱ्यांना जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य कार्यकर्ते प्रश्न विचारताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिस अधिकाऱ्यांना आपले ओळखपत्र दाखवायला लावले.

मी पुन्हा आलो; पण एवढ्या सकाळी सकाळी... 

ओळखपत्र पाहिल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी संबंधित अधिकाऱ्याला म्हणाले, इतका वरिष्ठ अधिकारी इथं येऊन बसतो कसा? आम्हाला काय वेडे समजता का? तुमचे कामच काय इथे?, अशा प्रश्नांचा भडीमार आव्हाडांनी केला. त्यानंतर संबंधित अधिकारी तिथून निघून गेला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jitendra Awhad angry on Police officer who present in Hotel