कुलकर्णी आडनाव लावले की, पोलिस मागे लागत नाहीत- आव्हाड

कुलकर्णी आडनाव लावले की, पोलिस मागे लागत नाहीत- आव्हाड

मुंबई : डोंबिवलीत धनंजय कुलकर्णी नावाच्या भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडला होता. परंतु, त्याला पोलिस कोठडी न मिळता थेट न्यायालयीन कोठडी मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. यावरून त्यांनी कुलकर्णी आडनाव लावले की, पोलिस मागे लागत नसल्याचा थेट आरोप केला आहे.

आव्हाड म्हणाले, की धनंजय कुलकर्णीला थेट आधारवाडी कारागृहामध्ये पाठवण्यात आले आहे. पोलिस कोठडी मगितलीच नाही. यामधून एक गोष्ट स्पष्ट होते, की कुलकर्णी आडनाव लावले की पोलिस मागे लागत नाहीत. यामुळे मीच आता माझे आडनाव बदलून घेण्याचा निर्णय घेतला असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले आहे. पुढे त्यांनी माझा महाराष्ट्र बदलत असल्याचेही सांगितले आहे.

दरम्यान, डोंबिवलीतील मानपाडा रोड परिसरात फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून तब्बल 170 शस्त्रास्त्रे कल्याण गुन्हे शाखेने हस्तगत केली आहे. धनंजय कुलकर्णी असे अटक केलेल्या दुकानदाराचे नाव होते. तो भाजपचा पदाधिकारी असल्याचेही समोर आले होते. या प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही निवेदन प्रसिद्ध करत म्हटले होते, की डोंबिवलीतील भाजप शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. चॉपर, तलवारी, एयरगन, फायटर्स, चाकू, सुरे, कुऱ्हाडी अशी शस्त्रास्त्र ताब्यात घेतली आहेत. येणाऱ्या काळात भाजप कशाप्रकारे राज्य सांभाळणार हेच यातून पाहायला मिळते. या शस्त्रांचा वापर करून भाजपला कोणत्या दंगली घडवायच्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. भाजपचे पदाधिकारीच जर अशाप्रकारे बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगणार असतील तर राज्यात गुंड आणि दहशतवाद्यांची गरजच उरणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com