हिंस्त्र वाघापेक्षा पाळीव कुत्र्यासारखा पंतप्रधान बरा : आव्हाड

हिंस्त्र वाघापेक्षा पाळीव कुत्र्यासारखा पंतप्रधान बरा : आव्हाड

मुंबई : भाजपने भारताचे प्राणी संग्रहालय करून टाकले आहे. भाषणामध्ये कायम वाघ, उंट, सिंह, मांजर असे काही प्राणी आणत असतात. या देशात माणसं राहतात त्यांना माणूस म्हणून पंतप्रधान हवा आहे, त्यांना वाघ, सिंह यासारख्या हिंस्त्र प्राण्यापेक्षा इमानदारी राखणाऱ्या कुत्र्यासारखा पंतप्रधान हवा आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मुंबईत एका सभेत मोदींना वाघाची उपमा दिली होती. तसेच त्यांनी विरोधकांना गली के कुत्ते म्हटले होते. यावरूनच आव्हाड यांनी मोदींना लक्ष्य केले आहे. आव्हाड पुढे म्हणाले की, आपण वाघाला कधीच जवळ ठेवत नाहीत, कारण तो हिंस्त्र असतो, तो आपल्याला कधीही खाऊ शकतो. सिंहाशी कोणी मैत्री केलेली आजपर्यंत आठवत नाही. कारण; सिंहाने मालकाला खाल्याची गोष्ट आफ्रिकेमध्ये पहायला मिळते. त्यामुळे हिंस्र असलेला वाघ किंवा सिंह हा जंगलात किंवा प्राणी संग्रहालयात मोठ्या पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवलेलाच बरा वाटतो. आपण पंतप्रधान मोदींना हेच उदाहरण दिले आहे. कुत्रा हा घराच्या बाहेर भटका असो किंवा पाळलेला कुठलातरी पाळीव असो पण तो मनुष्यजातीचा मित्र म्हणूनच ओळखला जातो आणि तो कधीच हिंस्त्र नसतो. फक्त तो वेळेप्रसंगी होतो आणि ती गरज असते. हाच कुत्र्यामध्ये आणि वाघामध्ये फरक आहे असे आव्हाड म्हणाले.

एकीकडे हिंस्त्र वाघ आणि दुसरीकडे प्रामाणिकपणाचे उदाहरण पाळीव कुत्रा यातले आपल्याला काय हवे ते आपणच ठरवायला हवे असल्याचेही आव्हाड यावेळी म्हणाले. आव्हाड यांनी त्यांच्या बोलण्यातून एक प्रकारे मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com