"आव्हाडांनी दोन्ही हातांनी पकडून ढकललं";आरोप करणाऱ्या महिलेनं सांगितला घटनाक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad criticize bjp on release of Aryan khan mumbai

"आव्हाडांनी दोन्ही हातांनी पकडून ढकललं"; आरोप करणाऱ्या महिलेनं सांगितला घटनाक्रम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार करणाऱ्या महिलेनं पत्रकार परिषद घेऊन आपल्या आरोपांबाबत आणि एकूण घटनाक्रमाबाबत माहिती दिली. आव्हाडांनी आपल्याला हाताला पकडून जोरात बाजुला ढकललं असं, असं या महिलेनं म्हटलं आहे.

हेही वाचा: मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

हेही वाचा: Shinde-Fadnavis: शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाखाली विधानसभा, लोकसभा लढवणार; बावनकुळेची घोषणा

घटनाक्रम सांगताना तक्रारदार महिलेनं सांगितलं की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आले तेव्हा खूपच गर्दी होती. ते जेव्हा पुन्हा निघाले तेव्हा त्यांना भेटायसाठी मी त्यांच्या वाहनाकडं गेले. गर्दीतून मधून गेल्यास मला भेटता येणार नाही म्हणून मी त्यांच्या कारला चिकटूनच जात होते. यावेळी तिथं जितेंद्र आव्हाड समोर आले, स्थानिक आमदार असल्यानं मी त्यांना ओळखते म्हणून मी त्यांना स्माईल केलं आणि क्षणभर थांबले तर ते म्हणाले की, तू इथे काय करते आणि त्यांनी माझ्या दोन्ही हातांनी धरुन बाजूला ढकललं. त्यामुळं बाजुला असलेल्या इतर पुरुषांच्या अंगावर मी गेले, हाच व्हिडिओ तुमच्यासमोर आला आहे. त्यानंतर मी डीसीपींकडे गेले आणि त्यांना सर्व सांगितलं तसेच तो व्हिडिओ माझ्याकडे होता. त्यानंतर त्यांनी मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुमचं म्हणणं सांगा, असा सल्ला दिला. त्यानंतर आव्हाडांनी मला हात लावल्यानंतर मला जे फिलिंग आलं तेच मी जबाबात सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी आव्हाडांवर गुन्हा दाखल केला"

हेही वाचा: Ajit Pawar: 'आव्हाड'प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी; पवारांनी मांडली रोखठोक भूमिका

"आता गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळं त्यावर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा आहे. आता या घटनेवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत की, असं होतं म्हणून पण असं सर्वांना चालत नाही. सर्वांना तुम्ही हातानं बाजूला करता तर एका महिलेला दोन्ही हातानं धरुन बाजुला ढकलता. यावर आता गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळं जे कायद्यात आहे जे सर्वांसाठी आहे ते त्यांना देखील लागू व्हावं" असंही तक्रारदार महिलेनं म्हटलं आहे.