'इथे देवीच्या मूर्तीची पूजा केली जाते अन्...'; हाथरस बलात्कारप्रकरणी जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

तुषार सोनवणे
Wednesday, 30 September 2020

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याघटनेवर हताश प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मुंबई - उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कारामुळे देश हादरला आहे. देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याघटनेवर हताश प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उत्तरप्रदेशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असं त्यांनी म्हटले आहे.

७ नंतरही दुकानं सुरु ठेवली; ठाण्यात ७२ दुकानांना टाळं, पालिकेची धडक कारवाई

उत्तर प्रदेशातील हाथरस इथं सामूहिक बलात्कार झालेल्या पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. बलात्कार करणाऱ्या नराधमांनी पीडितेची जीभ कापली होती. याशिवाय जबर मारहाण केली होती. यात तिच्या पाठीचे हाडही मोडले होते. गेल्या आठवड्याभरापासून ती सफदरजंग रुग्णालयात मृत्यूशी लढा देत होती. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला. 

या घटनेवर जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करून हताशा व्यक्त केली आहे. ते या ट्विटमध्ये मध्य़े म्हणतात, “आपण अशा देशात राहतो, जिथे देवींच्या मूर्तींची पूजा केली जाते आणि त्यांचा आदर केला जातो. हाच आदर आपल्याला देह आणि रक्त असणाऱ्या स्त्रियांबद्दल कधी बघायला मिळणार आहे,”

 वैद्यकीय चाचणीमध्ये अशी माहिती समोर आली होती की, नराधमांनी बलात्कारानंतर पीडितेच्या पाठीचे हाड मोडले होते. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. 21 सप्टेंबरला पीडित तरुणी शुद्धीवर आल्यानंतर करण्यात आलेल्या वैदकीय चाचणीच्या अहवालात सामूहिक बलात्कार केला असल्याचं स्पष्ट झालं. पीडित तरुणीने असंही सांगितलं की,  तिने लोकांना हा प्रकार सांगू नये आरोपींनी तिची जीभही कापली.

---------------------------------------------------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jitendra Awhads reaction to the Hathras case