लघू आणि मध्यम उद्योगांमधील रोजगारनिर्मिती ठप्प; रोजगारनिर्मितीचा वेग नीचांकावर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

मुंबई : अर्थव्यवस्थेतील मंदीच्या पार्श्‍वभूमीवर लघू आणि मध्यम उद्योगांमधील रोजगारनिर्मिती ठप्प पडली आहे. गेल्या दोन वर्षांत देशातील रोजगारनिर्मितीचा वेग कमी होत असल्याचे 'केअर रेटिंग्ज' या संस्थेच्या अहवालातून व्यक्त करण्यात आला.

2017-18 या वर्षात रोजगारनिर्मितीचा वृद्धीदर 3.9 टक्के आणि 2018-19 मध्ये तो 2.8 टक्‍क्‍यांपर्यंत घसरला असल्याचे 'केअर रेटिंग्ज'ने म्हटले आहे. 

शिवसेना आमदारांना पाच दिवसाचे कपडे, आधार आणि पॅनकार्ड घेऊन येण्याचे आदेश
 
बड्या कॉर्पोरेट्‌सपासून लघू आणि मध्यम प्रकारातील 1 हजार 938 कंपन्यांची मते जाणून घेतली. ज्यात "एसएमई' उद्योगांमधील रोजगारनिर्मिती ठप्प असल्याचे दिसून आले. 2014-15 ते 2018-19 या कालावधीत रोजगारनिर्मितीत सरासरी 3.3 टक्‍क्‍याची वाढ झाली.

Jio पुन्हा देणार ग्राहकांना मोठा धक्का..

वार्षिक आधारावर 2015-16 मध्ये रोजगारनिर्मितीत केवळ 2.5 टक्के आणि 2016-17 मध्ये ती 4.1 टक्के राहिली. गेल्या काही वर्षांत जीडीपीच्या तुलनेत रोजगारनिर्मितीच्या प्रमाणात घसरण होत असल्याचे दिसून आले. उत्पादन क्षेत्राशी निगडित हेल्थकेअर आणि वाहन उत्पादक आदी उद्योगांमध्ये रोजगारात वाढ झाल्याचे 'केअर रेटिंग्ज'ने अहवालात म्हटले आहे.

WebTitle : jobs creation in small and medium business almost stopped in mumbai

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jobs creation in small and medium business almost stopped in mumbai