"जॉली एलएलबी-2'चा वाद सर्वोच्च न्यायालयात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

मुंबई - अभिनेता अक्षयकुमारच्या आगामी "जॉली एलएलबी-2' या चित्रपटाचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोचला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुंबई - अभिनेता अक्षयकुमारच्या आगामी "जॉली एलएलबी-2' या चित्रपटाचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोचला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

"जॉली एलएलबी' या सुपरहिट चित्रपटाचा हा दुसरा भाग 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात न्यायव्यवस्थेची चेष्टा केलेली असून, आक्षेपार्हरीत्या न्यायालयांचे चित्रण केले आहे, असा दावा करणारी जनहित याचिका औरंगाबादमधील वकील अजयकुमार वाघमारे यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठापुढे सुनावणी झाली. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी न्यायालयाच्या तीनसदस्यीय समितीने हा चित्रपट पाहावा आणि अहवाल द्यावा, असे निर्देश न्या. व्ही. एम. कानडे यांच्या खंडपीठाने दिले होते. या निर्णयाविरोधात "फॉक्‍स स्टार स्टुडिओ'च्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

बुधवारी सरन्यायाधीश जे. एस. केहर, न्या. एन. व्ही. रामण्णा आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने याचिकेवर शुक्रवारी सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले. परिनिरीक्षण मंडळाने चित्रपट पाहून त्याला "यू-ए' प्रमाणपत्र दिल्यावर अन्य कोणत्याही समितीने चित्रपटाबाबत अहवाल देण्याची आवश्‍यकता नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

Web Title: jolly LLB 2 of the dispute the Supreme Court