शेगाव ते मुंबई... लिंबूविक्रेत्या महिलेचा प्रवास

मंगेश सौंदाळकर
शनिवार, 30 जून 2018

मुंबई - शेगावच्या रहिवासी विमलबाई तायडे या आठ वर्षांपासून शुक्रवारी पहाटे दादर मार्केटमध्ये येतात. भुसावळहून आणलेले लिंबू घाऊक व्यापाऱ्यांना विकून मिळणाऱ्या पैशातून ते आठवड्याच्या खर्चाचे नियोजन करतात. आठ वर्षांपासून विमलबाई दादर मार्केटमध्ये लिंबू विक्रीला येत आहेत. 

मुंबई - शेगावच्या रहिवासी विमलबाई तायडे या आठ वर्षांपासून शुक्रवारी पहाटे दादर मार्केटमध्ये येतात. भुसावळहून आणलेले लिंबू घाऊक व्यापाऱ्यांना विकून मिळणाऱ्या पैशातून ते आठवड्याच्या खर्चाचे नियोजन करतात. आठ वर्षांपासून विमलबाई दादर मार्केटमध्ये लिंबू विक्रीला येत आहेत. 

दर शनिवारी लिंबू-मिर्ची विकणारे एका लिंबू-मिरचीसाठी पाच रुपये आकारतात. त्या दिवसाच्या कमाईवर आठवडाभर गुजराण करतात. अशीच काहीशी परिस्थिती विमलबाईंचीही आहे. दर शुक्रवारी पहाटे दादरच्या मार्केटमध्ये लिंबू आणि मिरचीविक्रेते राज्यातील विविध ठिकाणांहून येत असतात. त्यापैकी एक शेगावच्या विमलबाई तायडे. शेतीला जोडधंदा म्हणून विमलबाई गुरुवारी सकाळी शेगावहून पतीसोबत निघतात. 

एक्‍स्प्रेसने दुपारी त्या भुसावळला उतरतात. स्थानिक बाजारातून  उपलब्धतेनुसार ते लिंबू विकत घेतात. त्यानंतर रात्री उशिरा दादर स्थानक गाठतात. १२.३० वाजल्यानंतर छोटे-मोठे लिंबू वेगळे करण्यास सुरुवात करतात. 

या प्रक्रियेला दोन-तीन तास लागतात. लिंबू वेगळे केल्यानंतर पहाटे ते घाऊक व्यापाऱ्यांना विक्रीकरता ठेवले जातात. घाऊकच्या विक्रीतून त्यांना ७००-८०० रुपये मिळतात. मिळणाऱ्या पैशातून त्या आठवड्याभराचे कौटुंबिक नियोजन करतात. कित्येकदा अनेक अडचणींना सामना त्यांना करावा लागतो. या लिंबूविक्रीच्या धंद्यामुळे त्यांना मुंबईचे दर्शन झाल्याचे विमलाबाई सांगतात.

पालघरचा रवी करतो रुईच्या पानांची विक्री
विमलाबाईप्रमाणे पालघर जिल्ह्यातल्या सातपाटी येथून रवी शिंगडा हा पत्नीसोबत गुरुवारी रात्रीच रुईची पाने विक्रीकरता घेऊन येतो. आपल्या गावातून गुरुवारी सकाळी गोळा केलेली रुईची पाने घेऊन तो सायंकाळी निघतो. रात्री दादर बाजारपेठेत आल्यावर पाने वेगळी केली जातात. सुमारे १०० पानांच्या जुडीला किमान १५-२० रुपये असा भाव त्यांना व्यापारी देतात. आठवड्यातून शुक्रवारच्या दिवशी  मिळणाऱ्या उत्पनातून तो कुटुंबाचा सांभाळ करतो.

Web Title: The journey of the vimalabai Lemon sales