जुहू चौपाटीवर स्वच्छता अभियान
जुहू चौपाटीवर स्वच्छता अभियान

जुहू चौपाटीवर स्वच्छता अभियान; चीनच्या अभियंत्यांचाही सहभाग

मुंबई : पर्यावरण, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या मुंबईतील स्पंदन युवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (ता.११) जुहू चौपाटीवरील कोळीवाडा येथील किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात मुंबई मेट्रो लाईन ३ चे काम करणारी चीनची शांघाई ट्युनल इंजिनिअरिंग कंपनीच्या मरोळ येथील प्रकल्पातील शंभरहून अधिक भारतीय व चीनचे अभियंते सहभागी झाले होते.

अभियंत्यांनी किनाऱ्यावरील प्लास्टिक व इतर कचऱ्याची सफाई केली. यात कंपनीचे अधिकारी शेन चेंगमिंग, तसेच स्पदंन युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ब्रह्मदेव आतकरी यांची विशेष उपस्थिती होती. शांघाय आणि मुंबई दोन्ही विकसित होणारी शहरे आहेत. दोन्ही शहरात बरेच साम्य असल्याचे आज जुहू चौपाटी स्वच्छता अभियान राबविताना जाणवले, असे शेन चेंगमिंग यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com