मतदानासाठी जुई गडकरी कर्जतमध्ये

हेमंत देशमुख
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

सरकारकडून नेहमी अपेक्षा करतो. मात्र त्या पूर्ण होण्यासाठी मतदानाचा हक्क बजवणे आवश्‍यक आहे. नवीन भारत घडविण्यासाठी योगदान दिले पाहिजे, असे सांगत जुईली गडकरी हिने चाहत्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. 

कर्जत (बातमीदार): "पुढचे पाऊल'सह अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी हिने आज कर्जतमध्ये मतदानाचा हक्क बजावला. जीवन शिक्षण मंदिर शाळेतील केंद्रात तिने मतदान केले. 

सरकारकडून नेहमी अपेक्षा करतो. मात्र त्या पूर्ण होण्यासाठी मतदानाचा हक्क बजवणे आवश्‍यक आहे. नवीन भारत घडविण्यासाठी योगदान दिले पाहिजे, असे सांगत तिने चाहत्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. 

जुईली ही मूळची कर्जतमधील रहिवाशी आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश लाड आहेत. तर त्यांची प्रमुख लढत महेंद्र थोरवे यांच्याबरोबर होणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Juili Gadkari cast voting in Kajat